Chandrayaan 3 Update : 'चांद्रयान-3'ने केलं होतं दमदार लँडिंग! उडाला तब्बल 2 टन धुरळा, चंद्रावर मोठा खड्डा

विक्रम लँडरच्या इम्पॅक्टमुळे चंद्रावर मोठा 'इजेक्टा हॅलो' तयार झाल्याचं इस्रोने स्पष्ट केलं आहे.
Chandrayaan 3 Update
Chandrayaan 3 UpdateeSakal
Updated on

चांद्रयान-3 मोहिमेच्या माध्यमातून भारताने इतिहास रचला आहे. ही मोहीम यशस्वीपणे पार पाडून, चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ सॉफ्ट लँडिंग करणारा भारत पहिलाच देश ठरला होता. मात्र, आता इस्रोने दिलेल्या माहितीनुसार, ही लँडिंग म्हणावी तितकी 'सॉफ्ट' नव्हती. विक्रम लँडरच्या इम्पॅक्टमुळे चंद्रावर मोठा 'इजेक्टा हॅलो' तयार झाल्याचं इस्रोने स्पष्ट केलं आहे.

इस्रोने आज (27 ऑक्टोबर) एका एक्स पोस्टमध्ये याबाबत माहिती दिली. चांद्रयान-3 मधील विक्रम लँडर जेव्हा शिवशक्ती पॉईंटवर लँड झालं, तेव्हा तिथे मोठा खड्डा पडला. यालाच 'इजेक्टा हॅलो' म्हणतात. या प्रक्रियेत तिथली तब्बल 2 टन धूळ-माती (Lunar Epi-Regolith) बाजूला उडून पडाली, असं इस्रोने सांगितलं आहे.

Chandrayaan 3 Update
ISRO Gaganyaan Mission: अंतराळात मानवरहित मोहिमांचा मार्ग मोकळा! इस्रोच्या 'गगनयान मिशन'चे चाचणी उड्डाण यशस्वी

23 ऑगस्ट 2023 रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सुरक्षितपणे लँडिंग करुन चांद्रयानाने नवीन विक्रम नोंदवला होता. चांद्रयानातील विक्रम लँडर ज्याठिकाणी उतरलं, त्या जागेला शिव शक्ती पॉईंट नाव देण्याची घोषणा पंतप्रधान मोदींनी केली होती. यानंतर 14 दिवस चांद्रयान-3 मधील प्रज्ञान रोव्हर आणि लँडरने चंद्रावर विविध प्रकारचे प्रयोग केले.

यावेळी चंद्राच्या मातीमध्ये सल्फर, ऑक्सिजन आणि इतर बरेच घटक उपलब्ध असल्याचं स्पष्ट झालं होतं. 14 दिवसांनंतर जेव्हा चंद्रावर सूर्यास्त होणार होता, तेव्हा लँडर आणि रोव्हर दोघेही स्लीप मोडवर ठेवण्यात आले होते. त्यानंतर एका महिन्याने जेव्हा चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ पुन्हा सूर्यप्रकाश पोहोचला, तेव्हा चांद्रयान-3 पुन्हा जागं होण्याची आशा व्यक्त करण्यात येत होती. मात्र, असं झालं नाही.

Chandrayaan 3 Update
S. Somnath Autobiography : इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांचा प्रेरणादायी प्रवास समोर; आत्मचरित्र झालं प्रकाशित

इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ यांनीदेखील चांद्रयान-3 मोहीम यशस्वीपणे पार पडली असून, लँडर-रोव्हर जागे होण्याची आता शक्यता नसल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे आता विक्रम आणि प्रज्ञान हे चंद्रावर कायमस्वरुपी भारताचे राजदूत म्हणून राहणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com