Moon Mission: इस्त्रोने लेटेस्ट फोटो केला शेअर; चंद्र लाल आणि निळा का दिसतोय? जाणून घ्या

Moon Surface in Red and Blue Color
Moon Surface in Red and Blue Color
Updated on

Moon Surface in Red and Blue Color

नवी दिल्ली- भारताच्या चांद्रयान-३ मोहिमेला १५ दिवस होऊन गेले आहेत. आता चंद्रावर रात्र झाली असल्याने पुढील १४ दिवस विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर स्लिप मोडमध्ये गेले आहेत. इस्ज्ञोचे प्रज्ञान रोव्हरने पाठवलेला एक लेटेस्ट फोटो शेअर केला आहे. यात चंद्राची वेगळी झलक पाहायला मिळाली आहे. या फोटोमध्ये चंद्राचा पृष्ठभाग लाल आणि निळ्या रंगामध्ये दाखवण्यात आला आहे.

चंद्रावर अशा प्रकारचे रंग का दिसत आहेत? असा प्रश्न त्यामुळे निर्माण होत आहे. इस्त्रोने ५ सप्टेंबरला एक्सवर फोटो पोस्ट केला आहे. यामध्ये प्रज्ञान रोव्हरने ३० ऑगस्ट रोजी पाठवलेल्या फोटोला रिपोस्ट केला आहे. इस्त्रोने याबाबत माहिती देताना सांगितलं की, फोटो एनाग्लिफ Anaglyph स्टेरिओ म्हणजे मल्टी व्हू इमेज किंवा त्रिमितीय सादरीकरण आहे.

Moon Surface in Red and Blue Color
Chandrayaan 3 Photo : स्माईल प्लीज! 'प्रज्ञान रोव्हर'ने क्लिक केला 'विक्रम लँडर'चा फोटो; इस्रोने केला शेअर

एनाग्लिफ NavCam स्टेरियो इमेजचा उपयोग करुन हा फोटो काढण्यात आला आहे. प्रज्ञान रोव्हरने हा फोटो काढलाय. डाव्या बाजूचे दृश्य लाल रंगात दाखवण्यात आलंय, तर उजव्या बाजूचे दृश्य निळ्या आणि हिरव्या रंगात दाखवण्यात आले आहे. या दोन दृष्यांमधील अंतर स्टेरियो प्रभाव आहे. हा फोटो त्रिमितीय दृष्य दाखवतो, अशी माहिती इस्त्रोने दिली आहे.

प्रज्ञान रोव्हरवर लावण्यात आलेला अत्याधुनिक कॅमरा NavCam याला LEOS/ISRO ने निर्मित केले आहे. याची डाटा प्रोसेसिंग इस्ज्ञोकडून केली जात आहे. या जारी करण्यात आलेल्या नव्या फोटोमुळे चंद्राचं आणखी एक रुप पाहायला मिळालं आहे.

Moon Surface in Red and Blue Color
Chandrayaan 3 Update : 'चांद्रयान-3' बाबत मोठी अपडेट! प्रज्ञान रोव्हरने पार केलं 100 मीटरहून अधिक अंतर

भारताचे चांद्रयान २३ ऑगस्ट रोजी यशस्वीपणे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरले होते. चांद्रयान चंद्रावर उतरुन पंधरा दिवस झाले आहेत. या काळात प्रज्ञान रोव्हरने चंद्रावर अत्यंत महत्त्वाची माहिती गोळा केली आहे. दक्षिण ध्रुवावर १४ दिवस सुर्यप्रकाश असतो, तर १४ दिवस अंधार असतो. अंधाराच्या काळात चंद्रावरील तापमान ऋन २८० डिग्री असते. त्यामुळे सध्या विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरला स्लिप मोडमध्ये टाकण्यात आले आहे. १४ दिवसानंतर प्रज्ञान रोव्हर पुन्हा कामाला लागण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com