चॅट हिस्ट्री न गमावता WhatsApp नंबर कसा बदलाल? जाणून घ्या सोपा पर्याय

सकाळ न्यूज नेटवर्क
Tuesday, 9 February 2021

WhatsApp आपल्या यूजर्ससाठी अनेक सुविधा आणत असते

नवी दिल्ली- WhatsApp आपल्या यूजर्ससाठी अनेक सुविधा आणत असते. असेच एक फिचर नंबर बदलण्याचं आहे. याच्या मदतीने तुम्ही चॅट हिस्ट्री न गमावता आपला WhatsApp नंबर सहजपणे बदलू शकता. या फिचरची आणखी एक वैशिष्ट्य आहे की, युजर्स आपल्या कॉन्टॅक्ट्सना नंबर बदलल्याची माहिती ऑटोमॅटिक पद्धतीने देऊ शकतो. जाणून घ्या चॅट हिस्ट्री न गमावता तुम्ही WhatsApp नंबर कसा बदलाल.

‘टेन कमांडमेंटस फॉर फिनान्शियल फ्रीडम’

WhatsApp नंबर बदलण्याआधी तुम्हाला तुमचे नवे सीम मोबाईलमध्ये घालावे लागेल. अजूनही तुमचा जुना नंबर WhatsApp वर रजिस्टर्ड असेल. तुम्ही WhatsApp वर आपला रेजिस्टर्ड नंबर WhatsApp सेटिंग मेन्यूमध्ये प्रोफाईलवर टॅप करुन तुम्ही पाहू शकता. 

पुढील स्टेप्स करा फॉलो-

- मोबाईलवर व्हॉट्सअॅप ओपन करा
-तुम्ही आयपोन वापरत असला तर सेटिंग्जमध्ये जा
- तुम्ही अॅड्रॉईड युजर्स असाल तर ऍपच्या वरती दिलेल्या तीन डॉटवर क्लिक करा
-आता अकाऊंट ऑप्शनवर क्लिक करुन चेंज नंबरवर जा
-येथे तुम्हाला एक स्क्रीन दिसेल, तिथे तुम्हाला क्लिक करावे लागेल. त्यानंतर तुम्ही नव्या नंबरवर कॉल आणि एसएमएस रिसिव्ह करु शकाल
-नेक्स्टवर क्लिक करुन तुम्ही व्हॉट्सअॅप नंबर चेंज करण्याच्या फायनल स्टेपवर जाल
-WhatsApp तुम्हाला विचारेल की नंबर चेंज झाल्याची माहिती तुमच्या कॉन्टॅक्संना द्यायची आहे का?
-येथे तुम्हाला All Contacts, Contacts I have chat with किंवा custom numbers ऑपश्न दिसेल. तुमच्या नंबर चेंज केल्याची माहिती WhatsApp ग्रुपवर ऑटोमॅटिक पोहोचेल. 
-आता Done वर क्लिक करा

‘युलिप’मध्ये नक्की काय झालाय बदल?
शेवटी WhatsApp तुम्हाला नवा नंबर रेडिस्टर करण्यासाठी सांगेल. नंबर रेजिस्टर करण्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलवर 6 अंकी कोड पाठवला जाईल. नंबर रेजिस्टर झाल्यानंतर तुम्ही चॅटिंग सुरु करु शकता. तुम्ही नंबरसोबतच मोबाईल चेंज करणार असाल तर तुम्हाला गुगल ड्राईव्ह किंवा iCloud वर चॅट्स बॅकअप घ्यावे लागेल. भारत


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: change WhatsApp number without losing contacts history