
लॅपटॉपने फोन चार्ज केल्याने चार्जिंग स्पीड खूप कमी होते, ज्यामुळे वेळ अधिक लागतो.
कमी पॉवरमुळे फोनची बॅटरी आणि हार्डवेअरवर दीर्घकालीन वाईट परिणाम होऊ शकतो.
लॅपटॉप बंद झाल्यास अचानक चार्जिंग थांबते आणि डेटा ट्रान्सफरमध्ये अडथळा निर्माण होतो.
phone charging tips for better battery life: तुम्ही अनेक लोकांना पाहिले असेल की फोन लॅपटॉपला चार्जिंगला लावतात. असे प्रत्येकजण आपल्या सोयीसाठी करतात. पण असं करणं धोकादायक ठरु शकते. स्मार्टफोनला त्याच्या मूळ चार्जरनेच चार्ज करणे उत्तम आहे. दुसरीकडे, जर तुम्ही प्रवास करत असाल किंवा तुमच्याकडे अॅडॉप्टर नसेल आणि फोनची बॅटरी संपणार असेल, तर तुम्ही तो लॅपटॉपने चार्ज करू शकता. पण असे नेहमीच करणे योग्य नाही. याचा फोनवर काय परिणाम होतो हे जाणून घेऊया.