Google ला टक्कर देणाऱ्या 'Chat GPT' कंपनीचा मोठा निर्णय! नवं व्हर्जन येण्याआधीच सर्व्हिस पेड

नवं व्हर्जन येण्यापूर्वी कंपनीने आता सेवा पेड करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे
Chat GPT
Chat GPTesakal

Chat GPT Is Paid : चॅट जीपीटी हे सर्च इंजिन असून ते वापरण्यासाठी आता पैसे मोजावे लागणार आहे. हे एक आर्टिफिशीयल इंटेलिजन्सवर आधारित सर्च इंजिन आहे. आतापर्यंत चॅट जीपीटीचा वापर फ्री होता. मात्र आता त्यासाठी पैसे मोजावे लागणार आहे. कंपनीचं आता चॅट GPT व्हर्जन 4 येणार आहे. मात्र नवं व्हर्जन येण्यापूर्वी कंपनीने आता सेवा पेड करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.

GPT साठी आकारणार शुल्क

विकीपीडियाच्या स्वास्थ या उपक्रमाचे दिग्दर्शक कम्युनिकेश एक्सपर्ट आणि डेटा सायंटिस्ट अभिषेक सूर्यवंशी यांनी जीपीटीसंदर्भात एक ट्वीट केलं आहे. त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, 'चॅट GPT साठी आता शुल्क आकारण्यात येणार आहे. तेव्हा विविध देशांच्या खर्च करण्याच्या क्षमतेवर आधारित शुल्क आकारण्यात येण्याची आशा आहे.

नेमकं कसं काम करतं हे सर्च इंजिन?

ओपनएआयने चॅट जीपीटी (Chat GPT) तयार केला आहे. हे गुगल सर्च इंजिनप्रमाणे काम करते. पण याची उत्तर देण्याची पद्धत गुगलपेक्षा खूप वेगळी आहे. गूगल तुम्हाला कोणत्याही प्रश्नाला उत्तर म्हणून अनेक वेबसाइट्सच्या लिंक देते, पण चॅट जीपीटी तुमच्या प्रश्नाचे थेट उत्तर देते. त्यामुळे येत्या काळात चॅट GPT गुगलला चांगली टक्कर देणार आहे. (Search Engine)

चॅट जीपीटी भविष्यात देणार गूगलला टक्कर

चॅट GPT हे चॅटबॉट म्हणजेच सर्च इंजिन 30 नोव्हेंबर 2022 रोजी लाँच करण्यात आलं होतं. लाँच झाल्यापासून चेट GPT चर्चेत आहे. चॅट जीटीपीमध्ये गूगलला संपवण्याची क्षमता आहे असंही जाणकार म्हणतात. त्यामागे कारण म्हणजे गूगलवर एखादा प्रश्न टाकला की तुम्हाला भरपूर लिंक्स येतात. मात्र चॅट जीटीपीमध्ये थेट उत्तर तुम्हाला मिळतं. त्यामुळे गूगलची स्पर्धा करणाऱ्या या सर्च इंजिनमुळे गूगलं अस्तित्व भविष्यात संपुष्टात येऊ शकतं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com