Whatsapp ChatGPT : व्हॉट्सअ‍ॅपमध्ये आले ChatGPT; झाली नव्या फीचरची एंट्री, वापरा 'या' 3 स्टेप्समध्ये..

ChatGPT AI Image generator in Whatsapp : व्हॉट्सअ‍ॅपवर आता ChatGPT चा AI इमेज जनरेटर वापरता येणार आहे. फक्त तीन स्टेप्समध्ये क्रिएटिव फोटो तयार करण्याच्या सोप्या पद्धती जाणून घ्या
ChatGPT AI Image generator in Whatsapp
ChatGPT AI Image generator in Whatsappesakal
Updated on: 

Whatsapp New Feature : आता व्हॉट्सअ‍ॅप यूजर्ससाठी एक नवी सुविधा सुरू करण्यात आली आहे ChatGPT चा AI इमेज जनरेटर आता थेट व्हॉट्सअ‍ॅपवर वापरता येणार आहे. OpenAI ने ही सेवा जगभरातील निवडक प्रदेशांमध्ये उपलब्ध करून दिली आहे. ही सुविधा वापरून व्हॉट्सअ‍ॅप यूजर्स दररोज एक AI-निर्मित चित्र मोफत तयार करू शकतात किंवा एडिट करू शकतात.

ही नवी सुविधा आधी फक्त ChatGPT च्या मोबाईल व वेब अ‍ॅप्सवर मर्यादित होती. मात्र आता ती व्हॉट्सअ‍ॅपसारख्या जगातील सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या मेसेजिंग अ‍ॅपमध्येही उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे वापरकर्त्यांना अधिक सोयीस्कर आणि सर्जनशील अनुभव घेता येणार आहे.

फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये

  1. अधिकृत नंबर सेव्ह करा: तुमच्या फोनमध्ये +1 (800) 242-8478 हा OpenAI चा अधिकृत नंबर सेव्ह करा.

  2. चॅट सुरू करा: WhatsApp उघडा आणि "Hi" असा मेसेज या नंबरवर पाठवा.

  3. अकाऊंट लिंक करा: मिळालेल्या सूचनेनुसार सुरक्षित लॉगिन पेजवर तुमचं OpenAI अकाउंट लिंक करा. लिंकिंग पूर्ण झाल्यावर तुम्ही "Create a surreal image of a sunny valley" अशा पद्धतीने कमांड देऊन इमेज तयार करू शकता.

ChatGPT AI Image generator in Whatsapp
Plane Crash New Video : अहमदाबादमध्ये विमान कोसळलं अन् विद्यार्थ्यांनी चौथ्या मजल्यावरून मारल्या उड्या; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल

दररोज एक मोफत इमेज

सध्या ही सुविधा मोफत असून, दर २४ तासांमध्ये एक इमेज तयार करण्याची मर्यादा आहे. OpenAI च्या चाचण्यांमध्ये ही प्रक्रिया दोन मिनिटांच्या आत पूर्ण होते, त्यामुळे वापरकर्त्यांना जलद आणि सुरळीत अनुभव मिळतो.

काही वापरकर्त्यांनी खाते लिंक करताना अडचणीचा अनुभव दिला आहे, मात्र OpenAI या फिचरचे इंटीग्रेशन अजून अधिक स्थिर बनवण्यासाठी काम करत आहे. लवकरच हे फिचर सर्व वापरकर्त्यांसाठी सुटसुटीतपणे उपलब्ध होईल, असा अंदाज आहे.

ChatGPT AI Image generator in Whatsapp
CCTV Tips : सीसीटीव्ही कॅमेरे तुमच्यावर गुपचूप ठेवतायत नजर? माहिती लिक होण्याआधीच तपासा 'या' 5 सेटिंग्ज

व्हॉट्सअ‍ॅपवर ChatGPT

AI इमेज जनरेशन व्यतिरिक्त, ChatGPT व्हॉट्सअ‍ॅपवर इतर अनेक उपयुक्त गोष्टींसाठी वापरता येतो जसे की ईमेल लिहिणे, रेसिपीज सुचवणे, मजकूराचे प्रूफरीडिंग करणे, किंवा फोटो अपलोड करून त्याचं विश्लेषण करून देणे.

Meta कंपनीने आधीच Meta AI नावाचा असिस्टंट व्हॉट्सअ‍ॅपवर लाँच केला आहे, मात्र ChatGPT ची संवाद कौशल्यं आणि सर्जनशीलता यामुळे तो खास ठरतो.

ChatGPT चं व्हॉट्सअ‍ॅपमध्ये प्रवेश करणं ही AI टेक्नोलॉजी सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने एक मोठी पायरी आहे. यामुळे यूजर्सना एकाच अ‍ॅपमधून दैनंदिन कामं, क्रिएटिव्ह प्रोजेक्ट्स आणि संवाद अधिक प्रभावीपणे हाताळता येणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com