
सध्या सुरक्षिततेसाठी घरांपासून ते दुकाने, कार्यालये आणि सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. परंतु हेच कॅमेरे चुकीच्या पद्धतीने सेट केल्यास आपल्या गोपनीयतेसाठी धोका ठरू शकतात. बाहेरच्यांना थोडक्यात हॅकर्सना अनधिकृत प्रवेश मिळू शकतो किंवा कॅमेरे आवश्यकतेपेक्षा जास्त माहिती रेकॉर्ड करत असू शकतात. त्यामुळे सुरक्षिततेच्या सोयीसोबतच गोपनीयतेचे रक्षण करणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी खाली दिलेल्या पाच महत्त्वाच्या सेटिंग्ज लगेच तपासाव्यात.
सीसीटीव्हीचा रिमोट व्ह्यूइंग फीचर वापरून आपण कुठूनही थेट फुटेज पाहू शकतो. मात्र, हेच फीचर कमजोर पासवर्ड किंवा टू-फॅक्टर ऑथेंटिकेशनशिवाय वापरल्यास हॅकिंगचा धोका निर्माण होतो. विशेषतः घरातील कॅमेरे असतील, तर रिमोट व्ह्यूइंग फक्त गरज असताना सुरू ठेवा आणि बाकी वेळा बंद करा.
आजच्या स्मार्ट सीसीटीव्ही सिस्टममध्ये "प्रायव्हसी झोन" सेट करण्याचा पर्याय असतो. यामध्ये तुम्ही कॅमेऱ्याच्या दृश्यातील काही विशिष्ट भाग ब्लॉक करू शकता जसे की तुमची खिडकी, बाथरूमचा दरवाजा किंवा शेजाऱ्यांचे घर. यामुळे फक्त संबंधित भागाचेच निरीक्षण होईल.
अनेक देशांमध्ये परवानगीशिवाय ऑडिओ रेकॉर्डिंग कायद्याने निषिद्ध आहे. तसेच, इच्छेविरुद्ध संभाषण रेकॉर्ड होणे गोपनीयतेला धोका पोहोचवू शकते. त्यामुळे तुम्ही जरी अशी सुविधा वापरत असलात तरी ऑडिओ रेकॉर्डिंग कायमस्वरूपी बंद ठेवणेच शहाणपणाचे ठरेल.
जास्त काळपर्यंत रेकॉर्डिंग सेव्ह करून ठेवणे म्हणजे माहिती लिकचा धोका वाढवणे. त्यामुळे CCTV प्रणाली ७ ते १५ दिवसांनंतर आपोआप जुनी फुटेज डिलीट करेल अशी सेटिंग करा, जोपर्यंत कायद्याने वेगळे काही सांगितले नसेल.
फुटेज नेहमी एन्क्रिप्टेड स्टोरेजमध्ये किंवा सुरक्षित क्लाऊड अकाउंटमध्ये साठवावे. कॅमेरा नेहमी पासवर्ड संरक्षित Wi-Fi नेटवर्कला जोडलेला असावा आणि वेळोवेळी त्याचे फर्मवेअर अपडेट करावे यामुळे नव्या हॅकिंग धोके टाळता येतात.
सीसीटीव्ही कॅमेरे म्हणजे फक्त सुरक्षा नव्हे, तर जबाबदारीही. चुकीच्या सेटिंग्जमुळे सुरक्षिततेऐवजी तुमची खासगी माहिती धोक्यात जाऊ शकते. त्यामुळे नियमितपणे सेटिंग्ज तपासा, सुरक्षित नेटवर्कचा वापर करा आणि गोपनीयतेचा आदर राखणारे स्मार्ट पर्याय निवडा. कारण सुरक्षिततेसोबतच 'प्रायव्हसी' देखील तुमचं मूलभूत हक्क आहे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.