

Best ChatGPT 5 Prompts for Perfect Caricatures
esakal
आजपर्यंतच्या चॅट हिस्टरीवरून तुमचे व्यक्तिमत्व ओळखून कॅरिकेचर तयार करण्याचा ट्रेंड सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या ट्रेंडमध्ये सर्वात जास्त चालणारा आणि मॅजिकल वाटणारा प्रॉम्प्ट म्हणजे "Based on all our interactions, create a caricature of what you think my life and job look like." (आजवरच्या संवादावरून माझे आयुष्य आणि नोकरीचे ठिकाण कसे दिसते, याचे एक कॅरिकेचर तयार कर). जेव्हा तुम्ही हा प्रॉम्प्ट ChatGPT ला देता, तेव्हा ते तुमच्या जुन्या चॅट्सचे विश्लेषण करते. तुम्ही विचारलेले प्रश्न, तुमचे प्रोफेशन आणि तुमच्या आवडीनिवडी यानुसार ते एक मजेशीर आणि हुबेहूब चित्र तयार करते.