ChatGPT : Smart ChatGPT ठरली बालिश; एका युजरला म्हणाली Sorry , त्याने Screenshot केला व्हायरल!

जेव्हा ChatGPT तुम्हाला म्हणतं सॉरी
ChatGPT
ChatGPTesakal

ChatGPT : चॅट जीपीटी एक कृत्रिम बुद्धिमत्ता साधन असून काही लोक याला दुसरे Google देखील म्हणत आहे. तरुण आणि तांत्रिक क्षेत्रातील जाणकार आजकाल सोशल साईट्सवर यावर सतत चर्चा करताना दिसत आहे. महत्वाचे म्हणजे त्यात २०२१ पूर्वी फक्त डेटा फीड आहे. अशात जे लोक चॅट जीपीटीला गुगलची रिप्लेसमेंट समजत आहे, त्यांना याविषयी अधिक जाणून घेण्याची आवश्यकता आहे.

हे जनरेटिव्ह प्री ट्रेन ट्रान्सफॉर्मर लँग्वेज मॉडेल आहे. जे Open AI ने विकसित केले आहे, जे सर्च बॉक्समध्ये लिहिलेले शब्द समजून घेऊन लेख, तक्ता, बातम्या, कविता अशा फॉरमॅटमध्ये उत्तर देऊ शकते. जेव्हा युजर्स ते वापरतात, तेव्हा व्याकरण दुरुस्त करते. पण, त्यात दिलेली माहिती पूर्णपणे बरोबर आहे की नाही त्याचीही फेरतपासणी होणे गरजेचे आहे.

ChatGPT
Chat GPT : सगळं जमलं, पण UPSC Pre पास होणं हे Chat GPT च्या तोंडचाही घास नाही!

ओपनएआयने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये लाँच केल्यापासून ChatGPT खूप लोकप्रिय झाले आहे. मोठे कोडिंग लिहिण्याच्या त्याच्या क्षमतेने लोक खूप प्रभावित झाले. तसेच, मार्चमध्ये ChatGPT म्हणजेच GPT-4 ची प्रगत आवृत्ती सादर केल्यानंतर, लोक त्याबद्दल आणखी आशावादी झाले. पण, तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की GPT-4 सुद्धा माणसांप्रमाणेच चुका करतो आणि सॉरीही म्हणतो.

एका Reddit वापरकर्त्याने GPT-4 सह संभाषणाचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. उत्तर देताना चॅटबॉटने टायपोग्राफिकल एरर केल्याचे निष्पन्न झाले. 'पेट शॉप रेकॉर्डिंग कन्सर्न' नावाच्या प्रश्नाला उत्तर देताना, चॅटबॉटने चुकीच्या पद्धतीने उल्लंघन करणारा शब्द लिहिला आणि त्याच्या उत्तरात कोणत्याही स्थानिक कायद्याचे उल्लंघन करणारे लिहिले.

ChatGPT
ChatGPT पेक्षाही भयानक आहे GPT-4, फक्त टेक्स्ट नव्हे तर फोटोजही हँडल करतो..वाचा खासियत

परंतु, जेव्हा वापरकर्त्याने चॅटबॉटला उल्लंघनाचा अर्थ विचारला तेव्हा त्याने चूक सुधारली. चॅटबॉटने माफी मागितली आणि सांगितले की इन्फ्रिशिंग ही टायपोग्राफिकल चूक आहे. यासाठी योग्य शब्द म्हणजे उल्लंघन करणे, म्हणजे नियम मोडणे.

ChatGPT चे अॅप

आम्ही तुम्हाला सांगतो की नुकतेच ChatGPT चे iOS अॅप अमेरिकेनंतर 32 देशांमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे. या देशांच्या यादीत भारताचेही नाव आहे. सध्या अॅपची अँड्रॉईड आवृत्ती सादर करण्यात आलेली नाही. आतापर्यंत हा चॅटबॉट फक्त वेबसाइटसाठी उपलब्ध होता. मात्र, अॅपच्या आगमनाने लोकांना ते वापरण्याची खूप सोय होणार आहे.

नेमकं कसं काम करतं हे सर्च इंजिन?

ओपनएआयने चॅट जीपीटी (Chat GPT) तयार केला आहे. हे गुगल सर्च इंजिनप्रमाणे काम करते. पण याची उत्तर देण्याची पद्धत गुगलपेक्षा खूप वेगळी आहे. गूगल तुम्हाला कोणत्याही प्रश्नाला उत्तर म्हणून अनेक वेबसाइट्सच्या लिंक देते, पण चॅट जीपीटी तुमच्या प्रश्नाचे थेट उत्तर देते. त्यामुळे येत्या काळात चॅट GPT गुगलला चांगली टक्कर देणार आहे.

चॅट जीपीटी भविष्यात देणार गूगलला टक्कर

चॅट GPT हे चॅटबॉट म्हणजेच सर्च इंजिन 30 नोव्हेंबर 2022 रोजी लाँच करण्यात आलं होतं. लाँच झाल्यापासून चेट GPT चर्चेत आहे. चॅट जीटीपीमध्ये गूगलला संपवण्याची क्षमता आहे असंही जाणकार म्हणतात. त्यामागे कारण म्हणजे गूगलवर एखादा प्रश्न टाकला की तुम्हाला भरपूर लिंक्स येतात. मात्र चॅट जीटीपीमध्ये थेट उत्तर तुम्हाला मिळतं. त्यामुळे गूगलची स्पर्धा करणाऱ्या या सर्च इंजिनमुळे गूगलं अस्तित्व भविष्यात संपुष्टात येऊ शकतं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com