ChatGPT Outage: ओपनएआयची (OpenAI) सेवा पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात ठप्प झाली आहे. बुधवारी सकाळपासून जगभरातील वापरकर्त्यांना चॅटजीपीटी, सोरा आणि जीपीटी एपीआय वापरण्यात अडचणी येत आहेत. या महिन्यातील हा दुसरा मोठा आउटेज आहे, ज्यामुळे प्लॅटफॉर्मच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. डाउन डिटेक्टरने देखील ओपनएआय बंद असल्याची पुष्टी केली आहे.