Cheap Laptop : आता गरीबांची पोरंही होतील अधिकारी, 9999 ला मिळतात हे ब्रँडेड Laptop

यामध्ये तुम्हाला मोठा स्क्रीन आणि प्रगत फीचर्स मिळतील
Cheap Laptop
Cheap Laptopesakal

Cheap Laptop : आज तंत्रज्ञानाच्या जगात लॅपटॉप, मोबाईल ही प्रत्येकाची गरज बनली आहे. अभ्यासापासून व्यवसायापर्यंत प्रत्येक कामासाठी लॅपटॉप आवश्यक झाला आहे. जगात तुम्हाला प्रत्येक किमतीचे लॅपटॉप मिळतील, परंतु बहुतेक लोक स्वस्त लॅपटॉप शोधतात कारण त्यांचे बजेट कमी आहे.

तुम्हाला कम्प्युटरवर कोणतेही काम करायचे असेल किंवा व्हिडिओज आणि गेमिंगचा आनंद घ्यायचा असेल तर तुम्ही लॅपटॉपवर या गोष्टी करू शकता. इथे आम्ही तुम्हाला Lowest Price Laptops बद्दल माहिती देऊ.

यामध्ये तुम्हाला मोठा स्क्रीन आणि प्रगत फीचर्स मिळतील. यासोबतच त्यांच्यामध्ये हायस्पीड प्रोसेसर आणि रॅम, जास्त स्टोरेज क्षमता आणि दीर्घकाळ चालणारी पॉवरफुल बॅटरीदेखील आहे.(Cheap Laptop)

तुम्हीही तुमच्यासाठी उत्तम लॅपटॉप शोधत असाल तर इथे दिलेल्या लॅपटॉप्सवर नक्की नजर टाका. आम्ही तुम्हाला 5 स्वस्त लॅपटॉप सांगत आहोत. ज्याची किंमत खूपच कमी आहे. चला जाणून घेऊया 2023 मध्ये सर्वात स्वस्त लॅपटॉप कोणता आहे? (Cheap Laptop : Cheap Laptop under 10,000)

Cheap Laptop
Samsung Laptop: 5G सपोर्टसह आला Samsung चा भन्नाट लॅपटॉप, फीचर्स खूपच जबरदस्त

आज आपण पाहत असलेले लॅपटॉप केवळ 10 हजार रुपयाचे आहेत. किंमत कमी असली तरी प्रेझेंटेशनच्या दृष्टीने उत्तम आहेत.

iBall CompBook Excelance

लॅपटॉपची किंमत फक्त 9,999 रुपये आहे. या लॅपटॉपमध्ये तुम्हाला 11.6-इंचाचा मोठा डिस्प्ले मिळेल. या लॅपटॉपचे डिस्प्ले रेझोल्यूशन 1366x768 पिक्सेलचे आहे. या लॅपटॉपचे वजन 1.09 किलो आहे. हा लॅपटॉप विंडोज 10  सह येतो.

या लॅपटॉपमध्ये इंटेल इंटिग्रेटेड एचडी ग्राफिक्स देण्यात आले आहेत. प्रोसेसरबद्दल बोलायचे झाले तर त्यात अॅटम क्वाड कोअर प्रोसेसर देण्यात आला आहे. या लॅपटॉपमध्ये 2 जीबी रॅम आणि 32 जीबी इनबिल्ट स्टोरेज देण्यात आले आहे.

Cheap Laptop
तासाभरातच उतरतेय Laptop Battery, मग या टिप्सच्या मदतीने लॅपटॉप होईल फास्ट

iBall Comp Book Exemplaire

लॅपटॉपची किंमत फक्त Rs.13999 आहे. या लॅपटॉपचा डिस्प्ले 14.00 इंच देण्यात आला आहे. या लॅपटॉपच्या प्रोसेसरबद्दल बोलायचे झाले तर या लॅपटॉपमध्ये अॅटम क्वाड कोअर प्रोसेसर देण्यात आला आहे. हा लॅपटॉप विंडोज 10 सह येतो. या लॅपटॉपमध्ये 2 जीबी रॅम आणि 32 जीबी इनबिल्ट स्टोरेज आहे. याशिवाय या लॅपटॉपमध्ये 10,000 mAh ची बॅटरी देखील देण्यात आली आहे.

Micromax Canvas Lapbook L 1161

या लॅपटॉपची किंमत रु.10499 आहे. या लॅपटॉपमध्ये 11.6 इंच डिस्प्ले आहे. हा लॅपटॉप Windows 10 OS वर देखील काम करतो. या लॅपटॉपमध्ये इंटेल अॅटम क्वाड कोर प्रोसेसर देण्यात आला आहे. या लॅपटॉपमध्ये 4100mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. या लॅपटॉपमध्ये 2 जीबी रॅम आणि 32 जीबी इनबिल्ट स्टोरेज देण्यात आले आहे.

Cheap Laptop
Windows PC Factory Reset : Windows PC, Laptop मधून येतोय विचित्र आवाज, तर तातडीने करा हे काम, नाहीतर बसेल हजारोंचा फटका!

XOLO Chromebook Netbook

या लॅपटॉपची किंमत रु.12,999 आहे. या लॅपटॉपमध्ये 11.6 इंच डिस्प्ले आहे. हा लॅपटॉप विंडोज 10 वर देखील काम करतो. या लॅपटॉपमध्ये Cortex A17 Quad Coreprocessor देण्यात आला आहे. या लॅपटॉपमध्ये 2 जीबी रॅम आणि 16 जीबी इनबिल्ट स्टोरेज देण्यात आले आहे.

Nexian Chromebook

या लॅपटॉपची किंमत रु.12999 आहे. या लॅपटॉपमध्ये 11.6 इंच डिस्प्ले आहे. या लॅपटॉपमध्ये Cortex-A17 क्वाड कोर प्रोसेसर देण्यात आला आहे. या लॅपटॉपमध्ये तुम्हाला 2 जीबी रॅम मिळेल. या लॅपटॉपमध्ये तुम्हाला व्हिडिओ कॉलिंगसाठी 1.0 MP कॅमेरा मिळेल.

या लॅपटॉपमध्ये 4200 mAH ची बॅटरी देण्यात आली आहे. तर आता तुम्हाला माहित असेलच की 2023 मध्ये सर्वात स्वस्त लॅपटॉप कोणता आहे? आम्ही तुम्हाला काही कंपन्यांचे लॅपटॉप सांगितले आहेत जे 10000 हजारांच्या श्रेणीत लॅपटॉप बनवतात.

Cheap Laptop
Cheap AC : हा एसी बसवताच विजेचे बिल येईल अवघे तीन बल्ब एवढे! घराला बनवा महाबळेश्वर

स्वस्त लॅपटॉप घेताना हे लक्षात ठेवा

याव्यतिरिक्तसुद्धा इतर अनेक पर्याय लॅपटॉपमध्ये आहेत. तुमची गरज आणि बजेट लक्षात घेऊन तुम्ही योग्य त्या पर्यायाची निवड करू शकता. शिवाय विविध कारणांनी अनेक कंपन्या यात ऑफर्सदेखील देत असतात. त्यात किंमतीत आणखी सूट मिळत असते.

लॅपटॉप घेताना त्याचा डिस्प्ले, स्टोरेज क्षमता, प्रोसेसर, ऑपरेटिंग सिस्टम इत्यादी बाबी महत्त्वाच्या असतात. शिवाय लॅपटॉप घेताना त्याचा बॅटरी बॅकअपदेखील लक्षात घ्यावा. याव्यतिरिक्त तुम्हाला जर काही अतिरिक्त फिचर्स हवे असतील तर कस्टमाईज स्वरुपातदेखील तुम्ही लॅपटॉप घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com