
Samsung Laptop: 5G सपोर्टसह आला Samsung चा भन्नाट लॅपटॉप, फीचर्स खूपच जबरदस्त
Samsung Galaxy Book 2 Pro 360 Details: सॅमसंगने आपला नवीन लॅपटॉप Samsung Galaxy Book 2 Pro 360 ला जागतिक बाजारात लाँच केले आहे. सॅमसंगचा हा लॅपटॉप स्नॅपड्रॅगन ८cx Gen ३ प्रोसेसरसह येतो. कंपनीने या लॅपटॉपला अनेक नवीन फीचर्ससह सादर केले आहे. याआधी कंपनीने फेब्रुवारी महिन्यात या सीरिजमधील लॅपटॉपला १२th Gen Intel प्रोसेसरसह लाँच केले आहे. या लॅपटॉपसोबत तुम्हाला स्टाइलस पेन देखील मिळेल.
Samsung Galaxy Book 2 Pro 360 ची किंमत
कंपनीने Samsung Galaxy Book 2 Pro 360 लॅपटॉपला सध्या दक्षिण कोरियात लाँच केले आहे. भारतासह इतर बाजारात लॅपटॉपला कधी लाँच करणार याबाबत कंपनीने अद्याप माहिती दिलेली नाही. हा लॅपटॉप ग्रेफाइट रंगात येतो. याची किंमत जवळपास १,२४,२०० रुपये आहे.
Samsung Galaxy Book 2 Pro 360 चे स्पेसिफिकेशनन्स
Samsung च्या या लॅपटॉपमध्ये स्नॅपड्रॅगन 8cx Gen 3 प्रोसेसर देण्यात आला आहे. कंपनीचा दावा आहे की, या प्रोसेसरमुळे बेस्ट प्रायव्हसी फीचर मिळतील. यात १३.३ इंच एमोलेड डिस्प्ले देण्यात आला असून, डिस्प्लेला ३६० डिग्री फ्लिप करू शकता.
लॅपटॉपमध्ये विंडोज ११ मिळेल. कंपनीचा दावा आहे की, सिंगल चार्जमध्ये लॅपटॉपची बॅटरी ३५ तास टिकते. यामध्ये तुम्हाला ५जी नेटवर्कचा देखील सपोर्ट मिळेल. लॅपटॉपसोबत एस पेन स्टाइलस मिळेल. कनेक्टिव्हिटीसाठी Wi-Fi 6E चा सपोर्ट मिळतो.
हेही वाचा: Best Car: ४० हजार द्या अन् नवीन गाडीसह साजरे करा २०२३ वर्ष, पाहा मारुतीच्या 'या' कारवरील भन्नाट ऑफर