देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर्स; किंमत 28,000 पासून सुरु | Electric Scooters | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Hero Electric Optima

देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर्स; किंमत 28,000 पासून सुरु

तुम्ही देखील इलेक्ट्रिक स्कूटर घेण्याचा विचार करत आहात, पण इलेक्ट्रिक वाहनांच्या (EV) किंमती जास्त असल्याने खरेदी करु शकत नाहीयेत. तर ही माहिती तुमच्यासाठी उपयोगी ठरु शकते. आज आपण देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटरची (electric scooters) यादी पाहाणार आहोत. त्यांची किंमत सुमारे 30 ते 40 हजार रुपये आहे आणि जे तुम्हाला 60 किलोमीटरपर्यंतची रेंज देतील. येथे देण्यात आलेल्या किंमती ऑटो वेबसाइट bikedekho नुसार सर्व आहेत, त्यामुळे त्या वेगवेगळ्या प्रदेशानुसार भिन्न असू शकतात.

Hero Electric Optima

Hero Electric Optima ची किंमत 55,580 रुपये आहे. Hero Optima HX इलेक्ट्रिक स्कूटर 1200W इलेक्ट्रिक मोटर आणि 51.2V/30Ah पोर्टेबल बॅटरीसह येते. कंपनीचा दावा आहे की पूर्ण चार्ज केल्यावर ही स्कूटर 82 किमी पर्यंतची रेंज देते. बॅटरी पूर्णपणे चार्ज होण्यासाठी तब्बल 5 तास लागतात. तर या स्कूटरचा टॉप स्पीड 42kmph आहे.

Ampere V48

या इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत 37,390 रुपये (एक्स-शोरूम) आहे. यात 48 V, 20 Ah बॅटरी देण्यात आली आहे, जी पूर्ण चार्ज केल्यावर सुमारे 50 किलोमीटर चालते. स्कूटरचा टॉप स्पीड 25 किमी प्रतितास आहे. तर स्कूटर पूर्णपणे चार्ज होण्यासाठी तब्बल 8 ते 10 तास लागतात.

हेही वाचा: Baby Shark ने मोडले सगळे रेकॉर्ड! यूट्यूबवर मिळाले 1000 कोटी व्ह्यूज

Ujaas eGO

Ujaas eGO इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत 34,880 रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे. यात 250W मोटर आणि 48V-26Ah बॅटरी दिली असून ही बॅटरी पूर्णपणे चार्ज होण्यासाठी 6-7 तास लागतात.

कंपनीचा दावा आहे की फुल चार्ज केल्यावर ती 60 किमी चालू शकते. यात डिजिटल स्पीडोमीटर, अँटी थेफ्ट अलार्म, टेलिस्कोपिक सस्पेंशन (समोर), हायड्रोलिक सस्पेन्शन (मागील) आणि अलॉय व्हीलयांसारखी वैशिष्ट्ये आहेत.

एव्हॉन ई लाइट

सायकलसाठी प्रसिद्ध असलेली कंपनी एव्हॉन देखील या इलेक्ट्रिक स्कूटरची विक्री करते. त्यांच्या या इलेक्ट्रिक स्कूटरचा किंमत 28,000 रुपये (एक्स-शोरूम) आहे. या हलक्या वजनाच्या स्कूटरमध्ये 48V 12AH बॅटरी आहे, जी पूर्ण चार्ज केल्यावर सुमारे 50-60 किलोमीटर चालते. स्कूटरचा टॉप स्पीड 24 किमी प्रतितास आहे. स्कूटर पूर्णपणे चार्ज होण्यासाठी 6 ते 8 तास लागतात.

हेही वाचा: शाकाहारामुळे सेक्सवर काय परिणाम झाला?, महिला पत्रकाराने सांगितला अनुभव

Web Title: Cheapest Electric Scooters In India Price Start From Only 28000 Rupees Check Details Here

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..