esakal | Kia ने लॉंच केली सर्वात स्वस्त SUV ची स्पेशल एडिशन, वाचा किंंमत-फीचर्स
sakal

बोलून बातमी शोधा

Kia Sonet

Kia ने लॉंच केली सर्वात स्वस्त SUV ची स्पेशल एडिशन, पाहा किंमत

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

दक्षिण कोरियाची आघाडीची वाहन निर्माता Kia मोटरने त्यांची बजेट सेगमेंटमधील एसयूव्ही Kia Sonet ची अॅनिव्हर्सरी एडिशन (Kia Sonet SUV Anniversary Edition) भारतीय बाजारात लॉंच केली आहे. कंपनीला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ही एसयूव्ही भारतीय बाजारात सादर करण्यात आली आहे. चला तर मग या एसयुव्ही बद्दल जाणून घेऊयात.

आकर्षक लूक आणि मजबूत इंजिन क्षमता देण्यात आलेल्या या SUV ची किंमत 10.79 लाख ते 11.89 लाख रुपये दरम्यान निश्चित करण्यात आली आहे. किया सोनेटची नवीन विशेष आवृत्ती पेट्रोल आणि डिझेल दोन्ही इंजिन आणि मॅन्युअल/ऑटोमॅटीक गिअरबॉक्ससह येते. रेग्युलर मॉडेलच्या तुलनेत कंपनीने त्यात काही खास फीचर्सचा समावेश केला आहे, ज्यामुळे ही एसयूव्ही आणखी दर्जेदार बनते.

फीचर्स

कंपनीने या SUV मध्ये काही कॉस्मेटिक बदल केले आहेत, ज्यात पुढील आणि मागील बाजूस स्किड प्लेट्स देण्यात आल्या आहेत. दरवाजे आणि व्हील सेंटर कॅप आणि बंपरवर टेंजरिन अॅक्सेंट देण्यात आले आहेत. या अॅनिव्हर्सरी एडिशनला नवीन डिझाइन ग्रिल आणि लोगो म्हणून एक बॅज देण्यात आला आहे.

फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर या एसयूव्हीमध्ये ऑटो एलईडी हेडलॅम्प, सिंगल पॅन सनरूफ, कीलेस एंट्री, रिमोट इंजिन स्टार्ट, 8.0 टचस्क्रीन इन्फोटेनमेंट देण्यात आले आहे, जे अॅपल कार प्ले आणि अँड्रॉइड ऑटोला जोडता येते. इतर फीचर्समध्ये ड्रायव्हिंग मोड, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, क्रूझ कंट्रोल हे फीचर्स मिळतीत.

सुरक्षा फीचर्ससाठी यात इलेक्ट्रॉनिक ब्रेकफोर्स डिस्ट्रीब्यूशन (ईबीडी), रियर पार्किंग सेन्सर्स, कॅमेरा, हिल स्टार्ट असिस्ट, ट्रॅक्शन कंट्रोल, ड्युअल एअरबॅग इत्यादींसह अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम (एबीएस) देण्यात आले आहे.

हेही वाचा: नोकियाचा सर्वात स्वस्त 5G फोन Nokia G300 लॉंच, पाहा किंमत

इंजिन

कंपनीने सोनेट अॅनिव्हर्सरी एडिशन दोन इंजिन पर्यायांसह सादर केले आहे, एक 1.0-लिटर टर्बो पेट्रोल आणि 1.5-लीटर डिझेल इंजिन. पेट्रोल इंजिन 120hp पॉवर आणि 172Nm टॉर्क जनरेट करते. त्याचबरोबर 1.5 लीटर डिझेल इंजिन 100hp पॉवर आणि 240Nm टॉर्क जनरेट करते. टर्बो पेट्रोल इंजिन 6 स्पीड iMT आणि 7 स्पीड ड्युअल क्लच ट्रान्समिशन गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. त्याच वेळी, डिझेल इंजिन 6-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटीक गिअरबॉक्ससह येते.

हेही वाचा: आधार कार्ड आता स्वतःलाच करता येईल अपडेट, ही आहे सोपी प्रोसेस

loading image
go to top