सर्वात स्वस्त मिळणारे देशातील टॉप 5 स्मार्टफोन्स; बघा फीचर्स

smartphone
smartphonegoogle

भारतीय इलेक्ट्रॉनिक्स बाजारात स्वस्तात मिळणारे अनेक दर्जादार स्मार्टफोन्स आहेत जे तुमच्या खिशाला परवडू शकतात. त्यामुळे लोकांना आता बजेट फ्रेंडली स्मार्टफोन निवडणे कठीण झाले आहे. तुम्हालाही स्वत:साठी स्वस्त स्मार्टफोन निवडता येत नसेल, तर आम्ही तुमच्यासाठी काही निवडक हँडसेट घेऊन आलो आहोत, जे तुमच्यासाठी बेस्ट ठरू शकतात. या सर्व स्मार्टफोनची किंमत 7000 रुपयांपेक्षा कमी आहे.

LAVA Z61 Pro

LAVA Z61 Pro स्मार्टफोनची किंमत 5,399 रुपये असून या स्मार्टफोनमध्ये 5.45 इंच स्क्रीन आहे, ज्याचे रिझोल्यूशन 1440 x 720 पिक्सेल आहे. या डिव्हाइसमध्ये फेस अनलॉक फीचर देण्यात आले आहे. तसेच या फोनमध्ये तुम्हाला Mediatek octa-core प्रोसेसर, 2GB RAM आणि 16GB इंटरनल स्टोरेज मिळेल. याशिवाय, LAVA Z61 Pro स्मार्टफोनमध्ये LED फ्लॅश लाइटसह 8MP कॅमेरा आणि समोर 5MP कॅमेरा आहे.

Panasonic Eluga I6

Panasonic Eluga I6 स्मार्टफोनच्या मागील पॅनलमध्ये LED फ्लॅशसह 8MP प्रायमरी कॅमेरा दिला आहे. समोर 5MP कॅमेरा देण्यात आला आहे. याशिवाय, स्मार्टफोनमध्ये ऑक्टा-कोर प्रोसेसर, 3000mAh बॅटरी, OTG सपोर्ट आणि 5.45-इंचाचा डिस्प्ले मिळेल. हा हँडसेट Android Pie v9.0 ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. तसेच या फोनची किंमत 5,489 रुपये आहे.

smartphone
Jio vs Airtel vs VI: 84 दिवसांचा कोणाचा प्लॅन आहे सर्वात स्वस्त?

Alcatel 5V

अल्काटेल 5V स्मार्टफोन 6,990 रुपयांच्या किंमतीला उपलब्ध आहे. या स्मार्टफोनमध्ये 3GB रॅम आणि 32GB इंटरनल स्टोरेज आहे. यात 6.2 इंचाचा डिस्प्ले आहे. याशिवाय, स्मार्टफोनमध्ये 4000mAh बॅटरी आणि 16MP रियर कॅमेरा आहे.

smartphone
रेडमीचा 5G फोन भारतात लॉंच; स्वस्तात मिळतायेत भन्नाट फीचर्स

itel Vision2S

itel Vision2S स्मार्टफोन 6,828 रुपयांच्या किमतीत उपलब्ध आहे. या स्मार्टफोनमध्ये 5000mAh बॅटरी दिली असून. या फोनमध्ये 6.52 इंच HD Plus IPS डिस्प्ले दिला आहे. याशिवाय, itel Vision2S स्मार्टफोनमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर, फेस अनलॉक तसेच 8MP ड्युअल एआय रिअर कॅमेरा आणि 5MP सेल्फी कॅमेरा मिळेल.

Nokia C01 Plus

Nokia C01 Plus स्मार्टफोनची किंमत 6,978 रुपये आहे. या फोनमध्ये स्क्रीन 5.45 इंच आहे. यात 5MP रियर कॅमेरा आणि 2MP फ्रंट कॅमेरा आहे. यासोबतच स्मार्टफोनमध्ये 3000mAh बॅटरी आणि ऑक्टा-कोर प्रोसेसर मिळेल. हा फोन Android 11 Go Edition वर काम करतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com