esakal | तब्बल ५०० विस्मयकारक रेडिओ स्फोटांचा शोध
sakal

बोलून बातमी शोधा

तब्बल ५०० विस्मयकारक रेडिओ स्फोटांचा शोध

तब्बल ५०० विस्मयकारक रेडिओ स्फोटांचा शोध

sakal_logo
By
सम्राट कदम @namastesamrat

पुणे : ब्रह्मांडामध्ये आढळणाऱ्या तब्बल ५०० विस्मयकारक स्फोटांचा शोध घेण्यास शास्रज्ञांना यश आले आहे. फास्ट रेडिओ बर्स्ट अर्थात एफआरबी नावाने ओळखल्या जाणाऱ्या या स्फोटांचा शोध भारतीय शास्रज्ञांनी कॅनडियन शास्रज्ञांच्या मदतीने घेतला आहे.

कॅनडियन हायड्रोजन इंटेन्सिटी मॅपिंग एक्सस्पिरिमेन्टच्या सहकार्याने राष्ट्रीय रेडिओखगोल भौतिकी केंद्राच्या शास्रज्ञांनी (एनसीआरए) हे संशोधन केले आहे. आजपर्यंत एफआरबी प्रकारातील महास्फोटांचा एवढ्या मोठ्या संख्येने शोध लागण्याची पहिलीच वेळ आहे. विशेष म्हणजे हा प्रकल्प सुरू झाल्यापासून पहिल्याच वर्षात एवढ्या रेडिओ स्फोटांची नोंद घेता आली आहे. आपल्या अकाशगंगेसह विश्वातील इतर आकाशगंगेतील स्फोटांचा या शोधात समावेश आहे. एनसीआरएचे प्राध्यापक आणि प्रकल्पाचे सदस्य डॉ. श्रीहर्ष तेंडुलकर, मॅकगिल विद्यापीठाच्या संशोधक विद्यार्थी प्रज्ञा चावला, मोहित भारद्वाज, प्रा. किओशी मासुई आदींचा या संशोधनात सहभाग आहे.

हेही वाचा: पेट्रोलचं शतक अन् ईडीची चौकशी

संशोधनाची पार्श्वभूमी

 • विश्वाची निर्मिती आणि आजचे अस्तित्व म्हणजे लहान मोठ्या स्फोटांची मालिकाच आहे

 • अशा स्फोटांतूनच सूर्यमाला आणि जीवन अस्तित्वात आले

 • शास्रज्ञ अशा स्फोटांची निरीक्षणे मिळवत असतात

 • त्यातीलच फास्ट रेडिओ बर्स्ट या रेडिओ स्फोटांची एवढ्या मोठ्या संख्येने नोंद झाली आहे

संशोधनाचे वैशिष्ट्ये

 • या रेडिओ स्फोटांची निर्मिती अजून माहीत नाही

 • त्यांचे वर्तन विस्मयकारक आहे

 • २००७ मध्ये पहिल्या अशा रेडिओ स्फोटाचा शोध लागला होता

 • आतापर्यंत फक्त १४० असे स्फोट शोधले गेले जाता

 • या शोधांमुळे रेडिओ स्फोटांचा कॅटलॉग अधिक समृद्ध झाला आहे.

हेही वाचा: मोबाईल ॲपद्वारे पिकांची होणार नोंद

असे झाले संशोधन

 • ब्रिटिश कोलंबियातील स्थिर रेडिओ दुर्बिणीचा स्फोटांची निरीक्षणे घेण्यासाठी वापर करण्यात आला

 • त्यासाठी विशिष्ट सॉफ्टवेअर विकसित करण्यात आले

 • २४ तास आणि सातही दिवस आकाशाचे स्कॅनिंग करण्यात आले. त्यातून या नोंदी मिळाल्या.

संशोधनाचे फायदे

 • अजून रहस्य असलेले तब्बल ५०० स्फोटांची नोंद झाली

 • त्यांच्या अभ्यासातून भविष्यात तारे, आकाशगंगा पर्यायाने विश्वाच्या निर्मिती संबंधी नवी माहिती मिळेल

 • विश्वाला समजून घेण्यासाठी एक विशाल अमर्याद खिडकी खुली झाली.