Oppo, OnePlus ला मोठा झटका! कंपन्याच्या स्मार्टफोनवर 'या' देशात बंदी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

china company oppo and oneplus banned in germany

Oppo, OnePlus ला मोठा झटका! कंपन्याच्या स्मार्टफोनवर 'या' देशात बंदी

चीनी मोबाईल कंपनी ओप्पो कंपनीला जर्मनीमध्ये मोठा कायदेशीर झटका बसला आहे. Nokiamob.net ने दिलेल्या वृत्तानुसार, मॅनहाइम रिजनल कोर्टाने Oppo सोबतच्या पेटंट वादात नोकियाच्या बाजूने निकाल दिला आहे. नोकियाने Oppo आणि OnePlus विरुद्ध दाखल केलेल्या दोन खटल्यांमध्ये न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. (china company oppo and oneplus banned in germany)

फिनलंड मधील प्रसिध्द कंपनी नोकियाने 2021 मध्ये चार वेगवेगळ्या देशांमध्ये ओप्पोवर खटला दाखल केला होता. चीनी स्मार्टफोन कंपनीशी एक करार पुर्ण होऊ न शकल्यानंतर कंपनीने हा खटला दाखल केला होता. दरम्यान आता निर्णयानंतर दोन्ही ब्रँडना त्यांचे डिव्हाइस जर्मनीमध्ये विकता येणार नाहीत.

फोनवर जर्मनीमध्ये कायमची बंदी आहे का?

नोकियाने Oppo विरुद्ध पेटंट वादात पहिला विजय मिळवला आहे. सध्यातरी Oppo आणि त्याचा भागीदार ब्रँड OnePlus यापुढे नोकियाच्या युरोपियन पेटंट EP 17 04 731 चे उल्लंघन करणारी मोबाइल डिव्हाईस जर्मनीमध्ये विकू शकणार नाहीत.

नोकियाने काय म्हटले?

नोकियाचे म्हणणे आहे की, ओप्पोने त्यांची निष्पक्ष आणि योग्य असलेली ऑफर नाकारली. आमच्या पेटंट लायसंन्स करारासाठी आम्ही Oppo शी चर्चा करत आहोत, परंतु दुर्दैवाने, त्यांनी आमच्या ऑफर नाकारल्या आहेत. खटला हा नेहमीच आपला शेवटचा पर्याय असतो, असे कंपनीने सांगितले आहे.

हेही वाचा: बजाज चेतक इलेक्ट्रिक स्कूटर महागलं; जाणून घ्या किती वाढली किंमत

Oppo ने या खटल्याला धक्कादायक म्हटले आहे आणि त्यांच्याकडून नोकिया विरुद्ध दाखल केलेल्या खटल्याला उत्तर देण्यात आले आहे. OPPO ने म्हटले आहे की, OPPO स्वतःच्या आणि Third-party intellectual property rights चा आदर करते आणि संरक्षण करते. तसेच पेटंट लायसन्स सहकार्यासाठी वचनबद्ध आहे. नोकियाच्या खटल्याच्या काही महिन्यांनंतर (सप्टेंबर 2021 मध्ये), Oppo ने चीन आणि युरोपमध्ये कंपनीविरुद्ध अनेक पेटंट उल्लंघनाचे खटले दाखल केले.

हेही वाचा: स्वस्तात 5G स्मार्टफोन शोधताय? हे आहेत 14 हजारांत मिळणारे बेस्ट फोन

Web Title: China Company Oppo And Oneplus Banned In Germany

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Technology
go to top