

Maglev Speed
esakal
नवी दिल्लीः चुंबकीय उत्सर्जन म्हणजे मॅग्लेव्ह तंत्रज्ञानाचा वापर करुन चीन देशाने एक जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे. नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ डिफेन्स टेक्नॉलॉजीच्या वैज्ञानिकांनी एक टन वजनाच्या टेस्ट वाहनासोबत हा प्रयोग केला. या वाहनाने केवळ दोन सेकंदांमध्ये ७०० किलोमीटर प्रतितास वेग धारण केला होता. हा प्रयोग ४०० मीटर लांब ट्रॅकवर झाला असून वाहनाला सुरक्षित रोखण्यात आलं.