esakal | ‘सिट्रोएन’ सी-5'ची किंमत ठरली, थेट कारखान्यातूनच खरेदी करा ही कार
sakal

बोलून बातमी शोधा

‘सिट्रोएन’ सी-5'ची किंमत ठरली, थेट कारखान्यातूनच खरेदी करा ही कार

जाणून घ्या,‘सिट्रोएन’ सी-5'ची किंमत

‘सिट्रोएन’ सी-5'ची किंमत ठरली, थेट कारखान्यातूनच खरेदी करा ही कार

sakal_logo
By
प्रणीत पवार

मुंबई : भारतात नुकताच दाखल झालेल्या बहुचर्चित एसयूव्ही प्रकारातील ‘सिट्रोएन सी-5 एअरक्रॉस’च्या किमतीवरील पडदा अखेर बुधवारी (7 एप्रिल) हटला. एकूण तीन व्हेरिएंटमध्ये (फील मोनो-टोन, फील वाय-टोन, शाईन मोनो-टोन/वाय-टोन) असलेली ही कार 29 लाख 90 हजारापासून 31 लाख 90 हजार या किमतीत भारतात उपलब्ध होणार आहे. 

विशेष म्हणजे सिट्रोएन सी-5ची ऑनलाईन पद्धतीने विक्री होणार असून, ग्राहकांना ती थेट कारखान्यातूनच खरेदी करता येणार आहे. याकरीता एक स्वतंत्र संकेतस्थळ देण्यात आले आहे. सिट्रोएनचे आंतरराष्ट्रीय पातळीवरील त्याचे यश आणि आधुनिक तंत्रज्ञान भारतीय ग्राहकांना नक्कीच समाधान देईल, असा विश्वास सिट्रोएनचे मुख्य कार्यकारी अधिकारी व्हिन्सेंट कोबे यांनी व्यक्त केला. बाजारात सादर होण्यापूर्वीच ‘सी5 एअरक्रॉस’ गाडीसाठी 1 हजारहून अधिक ग्राहकांनी नोंदणी केल्याचे सिट्रोएन इंडियाच्या सेल्स अ‍ॅण्ड मार्केटिंग विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष रोलँड बुशाहा यांनी सांगितले.

सीट्रोएन सी5 या ‘कम्फर्ट क्लास एसयूव्ही’ची रचना विशिष्ट गतिशील स्वरुपाची आहे. ही कार चार रंगांमध्ये उपलब्ध असून वरील भाग (टप) काळ्या रंगात देण्यात आला आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे होणारा त्रास कमी करण्यासाठी ‘फ्लाईंग कार्पेट इफेक्ट’ ही प्रगत हायड्रॉलिक कुशन असलेली सस्पेन्शन यंत्रणा खास ‘सिट्रॉन’तर्फे विकसित करण्यात आली आहे.

कारची वैशिष्ट्ये....

+ 2.0 लिटर डिझेल इंजिन, 8 स्पिड ऑटोमेटिक गिअर ट्रान्समिशन. सी5 एअरक्रॉस एसयूव्हीमध्ये सर्वोत्कृष्ट इंधन कार्यक्षमता जी 18.6 किमी प्रति लिटर मायलेज देते. 

+ 31.24 सेमी डिजिटल ‘ड्रायव्हर डिस्प्ले’, 20.32 सेमी इन्फोटेन्मेंट टचस्क्रीन, अॅपल कारप्ले आणि अँड्रॉईड ऑटो अादी तांत्रिक सुविधांचा समावेश आहे.

+ हवेशीर केबिन, तर शाईन या व्हेरिएंटमध्ये पॅनोरामिक सनरूफ, मल्टिपल ड्राईव्ह सर्फेस ऑप्शन्ससह अनोखी ग्रीप कंट्रोल सिस्टीम, ब्लाईंड स्पॉट मॉनिटरिंग सिस्टीम

+ पार्किंग सहाय्यक यंत्रणा, शाईन या व्हेरिएंटमध्ये फूट ऑपरेटेड हॅन्ड्स-फ्री इलेक्ट्रिक टेलगेट, इंजिन स्टॉप व स्टार्ट सिस्टिम आदी फीचर्स या कारमध्ये देण्यात आले आहेत. 

+ ही कार पर्ल व्हाईट, तिजुका ब्ल्यू’ क्युम्युलस ग्रे आणि पर्ला नेरा ब्लॅक या 4 रंगांमध्ये उपलब्ध असणार आहे. हे सर्व रंग बॉडी कलर व बाय-टोन पर्यायांमध्ये उपलब्ध आहेत.

संपादन :  शर्वरी जोशी

loading image