'या' कंपन्यांमध्ये पदवीशिवायही मिळते नोकरी !

वृत्तसंस्था
शुक्रवार, 24 ऑगस्ट 2018

गुगल, अॅप्पल यांसारख्या जगभरात प्रसिद्ध कंपन्यांमध्ये पदवीशिवाय नोकरी मिळते. मात्र, त्यासाठी लागते, संबंधित कामासाठी त्या कर्मचाऱ्याकडे पात्रता, क्षमता आणि कुशलता. याबाबतची पोस्ट 'ग्लासडोर ब्लॉग पोस्ट'ने प्रसिद्ध केली आहे.

नवी दिल्ली : चांगली नोकरी, पगार मिळण्यासाठी शैक्षणिक पात्रता गरजेची असते. त्यासाठी अत्यावश्यक असते ती म्हणजे पदवी. पदवी परीक्षा उत्तीर्ण असणे, ही कोणत्याही मोठ्या कंपन्यांमध्ये नोकरीसाठी प्राथमिक आवश्यकता बनली आहे. मात्र, जगातील अशा काही कंपन्या आहेत, की त्या कंपन्यांमध्ये नोकरीसाठी पदवीची गरज लागत नाही.

गुगल, अॅप्पल यांसारख्या जगभरात प्रसिद्ध कंपन्यांमध्ये पदवीशिवाय नोकरी मिळते. मात्र, त्यासाठी लागते, संबंधित कामासाठी त्या कर्मचाऱ्याकडे पात्रता, क्षमता आणि कुशलता. याबाबतची पोस्ट 'ग्लासडोर ब्लॉग पोस्ट'ने प्रसिद्ध केली आहे. या पोस्टमध्ये यासंबंधी माहिती देण्यात आली आहे. या पोस्टनुसार, अॅप्पल, गुगल यांसारख्या 15 कंपन्यांमध्ये नोकरी मिळण्यासाठी कोणत्याही विद्यापीठाची पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्राची आवश्यकता नाही.

याबाबत गुगलचे माजी वरिष्ठ उपाध्यक्ष लास्झलो बोक यांनी सांगितले, की ''जे लोक कधीही शाळेत गेले नाहीत. अशा लोकांकडे आपण जेव्हा पाहतो, मात्र, असे लोक शिक्षणाशिवाय जगात स्वत:चा मार्ग निर्माण करतात. असे लोक मानवी मूल्यात अपवादात्मक असे असतात. त्यामुळे आपण अशा लोकांना शोधून त्यांच्यासाठी काहीतरी केले पाहिजे''. 

- या कंपन्यांमध्ये मिळते पदवीशिवाय नोकरी -

1) गुगल 2) इर्नंस्ट अँड यंग (ईवाय) 3) पेनंग्यून रँडम हाऊस 4) व्होल फूड्स 5) कॉस्टको व्होलसेल 6) हिल्टन 7) पब्लिक्स 7) 8) अॅप्पल 9) स्टारबक्स 10) नॉर्डस्ट्रॉम 11) होम डेपोट 12) आयबीएम 13) बँक ऑफ अमेरिका 14) चिपोटी 15) लॉवेज्
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In this Companies get job without Degree