esakal | CoWIN चे नवीन फिचर! लसीकरणाबाबत समजणार 'ही' माहिती; जाणून घ्या सविस्तर
sakal

बोलून बातमी शोधा

cowin app

CoWIN चे नवीन फिचर! लसीकरण झाले की नाही समजणार

sakal_logo
By
महेंद्र महाजन

नाशिक : कोरोनाविरोधी लसीकरण केलेल्या व्यक्तीला लसीकरणाचे (vaccination) प्रमाणपत्र कोविनच्या माध्यमातून (coWIN app) देण्यात येते. कोविनच्या नव्या फिचरमुळे एखाद्या व्यक्तीचे लसीकरण झाले आहे की नाही हे माध्यमातून समजण्यासाठी मदत होणार आहे. जाणून घ्या सविस्तर...

नवीन फिचर दाखल

देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १६ जानेवारीपासून कोविडविरोधी लसीकरण सुरू केले आहे. आतापर्यंत ७२ कोटींपेक्षा अधिक लशी वितरित करण्यात आल्या आहेत. कोविनच्या माध्यमातून मिळणारे प्रमाणपत्र स्मार्टफोन, टॅबलेट, लॅपटॉपसारख्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये डिजिटल स्वरूपात कायमस्वरूपी ठेवता येते. शिवाय डीजी-लॉकरमध्ये प्रमाणपत्र ठेवून लसीकरणाचा पुरावा म्हणून हे प्रमाणपत्र सादर करता येऊ शकते. याच कोविनच्या माध्यमातून नो यूवर कस्टमर्स-क्लायंटस व्हॅक्सिनेशन स्टेटस (केवायसी-व्हीएस) हे नवीन फिचर दाखल झाले आहे. त्यामुळे एखाद्या व्यक्तीचे लसीकरण झाले आहे की नाही हे कोविनच्या माध्यमातून समजण्यासाठी मदत होणार आहे.

हेही वाचा: बाप्पाची आरती अन् नमाज अजान! दोन्ही योग एकाच दिवशी

सार्वजनिक ठिकाणासाठी उपयोग

मॉल, कार्यालय, संकुल, सार्वजनिक कार्यक्रम अशा ठिकाणी प्रवेशासाठी कोविड लसीकरण प्रमाणपत्र द्यावे लागते. ते डिजिटल आणि प्रत्यक्ष स्वरूपात उपलब्ध होऊ शकते. मात्र, काही प्रसंगी हे प्रमाणपत्र पूर्ण पाहण्याची गरज नसते. समोरील व्यक्तीने लस घेतली आहे की नाही एवढीच खरी माहिती जाणून घेणे आवश्‍यक असते. शिवाय एखाद्या व्यक्तीला कार्यालयात अथवा कामाच्या ठिकाणी कामे करण्यास पाठविण्यापूर्वी एखादी संस्था अथवा रोजगार देणाऱ्याला त्या व्यक्तीच्या लसीकरणाबाबत माहिती जाणून घेणे आवश्यक वाटते. रेल्वेगाडीतील जागेसाठी आरक्षण करणाऱ्या प्रवाशांचे लसीकरण झाले आहे की नाही हे माहीत करून घेणे रेल्वेला आवश्यक असते. अशावेळी याबद्दल खातरजमा करून घेऊन त्या व्यक्तीच्या लसीकरणाबाबत खात्रीशीर माहिती देणारा प्रतिसाद कोविन पाठवू शकेल.

हेही वाचा: ढोल ताश्यांच्या गजरात भुजबळ नाशिकात दाखल;पाहा व्हिडिओ

ती अशी - शून्य-व्यक्तीचे लसीकरण झालेले नाही. एक-व्यक्तीचे अंशतः लसीकरण झालेले आहे. दोन-व्यक्तीचे लसीकरण संपूर्णपणे झाले आहे. हा प्रतिसाद डिजिटली स्वाक्षरांकित असेल आणि तपासणी करणाऱ्या संस्थेला अथवा व्यक्तीला तो ताबडतोब सादर करता येईल. रेल्वेत तिकीट आरक्षण करताना सुविधेचा वापर एक प्रत्यक्ष उदाहरण म्हणून देता येईल. आरक्षित तिकीट घेण्यासाठी व्यक्तीने त्यावरून संबंधित संस्था त्याच वेळी व्यक्ती परवानगीने त्या व्यक्तीच्या लसीकरणाबद्दल माहिती मिळवू शकेल.

हेही वाचा: १३ वर्षांपासून मोईन खानकडून बाप्पाची भक्ती; इतरांसाठी ठरतेय आदर्श

loading image
go to top