esakal | बाप्पाची आरती अन् नमाज अजानचे सुर! दोन्ही योग एकाच दिवशी
sakal

बोलून बातमी शोधा

ganesh festival

बाप्पाची आरती अन् नमाज अजान! दोन्ही योग एकाच दिवशी

sakal_logo
By
युनूस शेख

नाशिक : बाप्पाची आरती आणि नमाज अजानच्या सुरात श्रीगणेशाची उत्साहात स्थापना करण्यात आल्याचा आगळावेगळा प्रसंग जुने नाशिक भागात बघावयास मिळाला. पवित्र शुक्रवार आणि विनायक चतुर्थी दोन्ही योग एकाच दिवशी जुळून आल्याने बाप्पाच्या मूर्तीची स्थापना, तसेच शुक्रवारच्या विशेष नमाजची लगबग या भागातील रहिवाशांमध्ये दिसून आली.

हेही वाचा: 24 वर्षात पहिल्यांदाच हुकली बाप्पांची मनमाड-मुंबई वारी!

पवित्र शुक्रवार आणि विनायक चतुर्थी दोन्ही योग एकाच दिवशी

जुने नाशिक परिसर संमिश्र लोकवस्ती असलेला परिसर आहे. हिंदू- मुस्लिम बांधव स्वातंत्र्यपूर्व काळापासून याठिकाणी एकत्र वास्तव्य करत आहे. त्यामुळे सण कुठल्याही समाजाचा असू द्या, दोन्ही समाज बांधवांकडून एकत्र साजरा केला जातो. याचेच एक उत्तम उदाहरण शुक्रवारी (ता.१०) बघायला मिळाले. विनायक चतुर्थी अर्थात गणेशोत्सवाची सुरवात यामुळे बाप्पाच्या आगमनाने हिंदू बांधवांमध्ये अतिशय उत्साहाचे वातावरण होते. सकाळपासूनच बाप्पाची मूर्ती स्थापनेसाठी विविध प्रकारच्या तयारीत बांधव व्यस्त होते. दुसरीकडे मुस्लिम बांधवांमध्ये विशेष महत्त्व असलेला शुक्रवार अर्थात छोटी ईदचा दिवस यामुळे असलेली विशेष नमाज पठण करण्यासाठीचा उत्साह मुस्लिम बांधवांमध्ये दिसून आला. इतकेच नाही तर एकीकडे शुक्रवारच्या विशेष नमाजचे अजान सुरू होती, तर दुसरीकडे येथील हिंदू बांधवांच्या घरोघरी बाप्पाच्या स्थापनेची आरती केली जात होती. दोन्ही सुरांमध्ये विधिवत बाप्पाची स्थापना आणि शुक्रवारची नमाज झाली. पहिल्यांदाच अशा प्रकारचा योग जुळून आला आहे. दोन्ही बांधवांनी आपापल्या पद्धतीने आपापले धार्मिक विधी शांततेत आणि उत्साहाच्या वातावरणात साजरे केले. गणेशोत्सवाचा असा योग पहिल्यांदाच आला असला तरी दोन्ही समाजातील सण सण मोठ्या गोडीगुलाबीने एकत्र येऊन या भागात साजरे केले जातात. प्रत्येक समाजाची महत्त्वाची धार्मिक मिरवणूकदेखील याच भागातून काढण्याची गेल्या अनेक वर्षाची परंपरा आहे. ती आजही येथील बांधवांकडून कायम ठेवण्यात आली आली आहे. संपूर्ण शहरासाठी ही गौरवाची बाब असल्याचे येथील नागरिकांकडून सांगण्यात येते.

हेही वाचा: पिंपळगाव बाजार समितीत बांगलादेशी व्यापाऱ्याकडून शेतकऱ्यांची लूट!

loading image
go to top