Flash Sale : ना ॲमेझॉन, ना फ्लिपकार्ट! 'या' ठिकाणी सुरुय बंपर सेल; 30 ते 50% पर्यंत डिस्काउंट, खरेदीसाठी लागल्या रांगा

Bumper discount sale : फ्लॅश सेलमध्ये एसी, आयफोन आणि स्मार्ट टीव्हीवर मोठ्या सवलती मिळत आहेत. एक्सचेंज ऑफर आणि बँक कॅशबॅकसह आता गॅजेट्स खरेदी करणे खूप सोपे झाले आहे.
Croma Flash Sale offering huge discounts

Croma Flash Sale offering huge discounts

esakal

Updated on

तुमच्या घरात नवीन गॅजेट किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू आणण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. सहसा आपण ऑनलाईन शॉपिंगसाठी नेहमी ॲमेझॉन किंवा फ्लिपकार्ट सारख्या मोठ्या वेबसाईट्सवर सेलची वाट पाहत असतो.

पण आता या सर्व ऑनलाईन वेबसाईट्सना टक्कर देण्यासाठी एका प्रसिद्ध स्टोअरने आपले दरवाजे ग्राहकांसाठी उघडले आहेत.

संपूर्ण देशात विश्वासू नाव असलेल्या क्रोमा स्टोअर्समध्ये (Croma Stores) सध्या एक अभूतपूर्व आणि बंपर सेल सुरू झाला आहे. या विशेष विक्रीला 'फ्लॅश सेल' (Flash Sale) असे नाव देण्यात आले असून यामध्ये ग्राहकांना स्वप्नवत वाटाव्यात अशा ऑफर्स आणि भरघोस सवलती मिळायला सुरुवात झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com