क्‍युरियॉसिटी रोव्हरने टिपली मंगळावरील ढगांची छायाचित्रे

वृत्तसंस्था
सोमवार, 3 जून 2019

अमेरिकेच्या अवकाश संशोधन संस्थेच्या (नासा) मंगळ मोहिमेचा भाग असलेल्या क्‍युरियॉसिटी बग्गीने मंगळावरील ढगांची छायाचित्रे पाठविली आहेत.

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या अवकाश संशोधन संस्थेच्या (नासा) मंगळ मोहिमेचा भाग असलेल्या क्‍युरियॉसिटी बग्गीने मंगळावरील ढगांची छायाचित्रे पाठविली आहेत.

मंगळावरील "माउंट शार्प' या डोंगराळ भागातील "गेल क्रेटर'च्या (दरी) तळाच्या भागाचा सध्या ही बग्गी अभ्यास करते आहे. "क्‍युरियॉसिटी'च्या माध्यमातून या ठिकाणी मंगळाच्या पृष्ठभागावर उत्खनन केले जात आहे. या वेळी बग्गीच्या वर बसविण्यात आलेल्या कॅमेऱ्यांनी मंगळावरील ढगांची कृष्णधवल छायाचित्रे टिपली असून, ती नुकतीच "नासा'कडून प्रसिद्ध करण्यात आली आहेत. 

7 ते 17 मे या कालावधीत ही छायाचित्रे टिपण्यात आली आहेत. या छायाचित्रांमध्ये दिसणाऱ्या ढगांमध्ये बर्फाच्या रूपात पाणी असल्याचे "नासा'ने म्हटले आहे. मंगळाच्या पृष्ठभागापासून सुमारे 31 किलोमीटर उंचीवर असलेल्या या ढगांचे पृथ्वीवरील ढगांशी मोठ्या प्रमाणात साधर्म्य आहे. दुसऱ्या ग्रहावरूनही मंगळावरील हे ढग दिसू शकतात, असे "नासा'ने स्पष्ट केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Curiosity Rover captured photos of clouds on the Mars

टॅग्स