

Cyber Attack Hits 178 Companies: BBC, CNN, Zoom and HSBC Websites Affected by Malware
esakal
जगातील अनेक नामांकित कंपन्यांच्या वेबसाइटवर मालवेअर हल्ला झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. Zoom, BBC, CNN, HSBC आणि Equifax यांसारख्या मोठ्या कंपन्यांसह 178 संस्थांच्या वेबसाइटवर सोमवारी JavaScript चा हानिकारक कोड आढळल्याचा दावा सायबर सुरक्षा क्षेत्रातील कंपनी Report URI ने केला आहे.
या हल्ल्यात ग्राहकांची क्रिप्टोकरन्सी, बँक कार्डचे तपशील आणि इतर संवेदनशील माहिती चोरण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.