Cambodia Indians Enslaved : 12-12 तास काम अन् उपासमार... कंबोडियामध्ये तब्बल 5,000 भारतीयांना बनवलंय 'गुलाम'?

Indians enslaved in Cambodia : गेल्या सहा महिन्यांमध्ये या सर्वांच्या मदतीने तब्बल 500 कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. हे सर्व पैसे विविध भारतीय नागरिकांकडून लुबाडण्यात आले आहेत.
Cambodia Indian Slaves
Cambodia Indian SlaveseSakal

Cyber Slaves in Cambodia : कंबोडिया देशातून एक गंभीर बातमी समोर आली आहे. याठिकाणी तब्बल 5,000 हून अधिक भारतीयांना गुलाम बनवून ठेवण्यात आल्याचा आरोप काही नागरिकांनी केला आहे. भारतीय नागरिकांची सायबर फसवणूक करण्यासाठी या सर्वांना जबरदस्ती भाग पाडलं जात असल्याचंही सांगण्यात येत आहे. याबाबत आता देशाच्या परराष्ट्र मंत्रालयाने चौकशी सुरू केली आहे.

याबाबत कंबोडियामधील भारतीय दूतावास (Indian Embassy in Cambodia) येणाऱ्या तक्रारींची सक्रियपणे चौकशी करत आहे. तसंच कंबोडिया सरकार देखील भारताचं पूर्ण सहकार्य करत असल्याची माहिती इंडियन एक्स्प्रेसने दिली आहे. परराष्ट्र मंत्रालयाने (Ministry of External Affairs) दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत सुमारे 250 भारतीय नागरिक यातून वाचले आहेत.

भारतीय नागरिकांचे हाल

यातील काहींनी दिलेल्या माहितीनुसार, या सर्वांना नोकरीच्या आमिषाने कंबोडियाला बोलावण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांना सोशल मीडियावर फेक अकाउंट उघडून भारतीयांची ऑनलाईन फसवणूक करण्याचं काम दिलं. या सर्वांकडून 12-12 तास काम करवलं जात होतं. जरादेखील आराम करण्याची परवानगी नव्हती. तसंच टार्गेट पूर्ण केलं नाही तर त्या दिवशी जेवण दिलं जात नसत, अशी माहिती एका पीडित व्यक्तीने दिली.

Cambodia Indian Slaves
Cyber Bullying: दर सहा मागे एका शाळकरी मुलासोबत होतंय 'सायबर बुलिंग'

500 कोटींची फसवणूक

मीडिया रिपोर्ट्सनुसार, गेल्या सहा महिन्यांमध्ये या सर्वांच्या मदतीने तब्बल 500 कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. हे सर्व पैसे विविध भारतीय नागरिकांकडून लुबाडण्यात आले आहेत. कैद करुन ठेवण्यात आलेले लोक भारतातील नागरिकांना अधिकारी असल्याची बतावणी करत फोन करायचे. तुमच्या पार्सलमध्ये संशयास्पद वस्तू मिळाली असल्याचं सांगून, कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी पैशांची मागणी करुन, त्या माध्यमातून नागरिकांची फसवणूक केली जात.

असं समोर आलं प्रकरण

गेल्या वर्षी एका केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्याची 67 लाखांची फसवणूक झाली होती. या प्रकरणी तपास करत असताना पोलिसांना कंबोडियामध्ये मानवी तस्करी करणाऱ्या टोळीचा शोध लागला. यातील आठ जणांना ओडिशामधून अटक करण्यात आली होती, आणि अन्य 16 जणांविरोधात लुकआऊट नोटीस जारी केली होती. यानंतर हैदराबाद विमानतळावर दोघांना ताब्यात घेण्यात आलं होतं. यानंतर या प्रकरणाचे धागेदोरे कंबोडियापर्यंत पसरले असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं.

Cambodia Indian Slaves
Cyber Crime : आता कंपनीचे कॉल्स येणार सहा अंकी क्रमांकावरुन; फोनवरुन होणाऱ्या फसवणुकीला बसणार आळा!

नोकरीच्या आमिषाने अडकले जाळ्यात

वाचवण्यात आलेल्या व्यक्तींपैकी स्टीफन नावाच्या व्यक्तीने सांगितलं, की त्याला कंबोडियामध्ये जॉब ऑफर आली होती. त्याठिकाणी गेल्यानंतर त्याला खरा प्रकार लक्षात आला. "मी डेटा एंट्रीच्या कामासाठी गेलो होतो. माझ्या सोबत आंध्र प्रदेशातील बाबू राव नावाची व्यक्ती आणि आणखी एक व्यक्ती होती. इमिग्रेशनच्या वेळी आपण टूरिस्ट व्हिसावर जाणार असल्याचं जॉब एजंटने सांगितलं, त्यामुळे मला थोडा संशय आला होता." असं स्टीफनने सांगितलं.

"त्यांनी आमचा टायपिंग स्पीड तपासला, त्यानंतर आम्हाला सांगितलं की सोशल मीडियावर अशा प्रोफाईल शोधा ज्यांची फसवणूक केली जाऊ शकते. ते सर्व लोक चिनी होते, मात्र एक मलेशियन व्यक्ती त्यांनी सांगितलेल्या गोष्टी आम्हाला इंग्लिशमध्ये सांगत होती. काही जणांना मुलींच्या नावाने खोटं अकाउंट बनवून लोकांना हनीट्रॅप करण्यास सांगितलं होतं. काही जण क्रिप्टो फ्रॉड करत होते.." अशी माहिती स्टीफनने दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com