Cyber Crime : आता कंपनीचे कॉल्स येणार सहा अंकी क्रमांकावरुन; फोनवरुन होणाऱ्या फसवणुकीला बसणार आळा!

Bank Calls : केंद्राच्या टेलिकम्युनिकेशन्स विभागाने अस्त्र नावाचं एक एआय/एमएल आधारित इंजिन तयार केलं आहे. फेक आयडी आणि खोटी कागदपत्रं वापरून घेतलेल्या मोबाईल कनेक्शनचा शोध लावण्यासाठी हे सर्च इंजिन मदत करतं.
Cyber Crime mobile
Cyber Crime mobileeSakal

Marketing Calls Six Digit Numbers : सध्या मोबाईल कॉलच्या माध्यमातून सायबर फसवणूक होण्याचं प्रमाण वाढलं आहे. कंपनीचे फोन नंबर आणि सामान्य ग्राहकांचे फोन नंबर हे दहा अंकीच असल्यामुळे हे होत आहे. फोनवर बोलत असणारी व्यक्ती ही कंपनीची कर्मचारी आहे की कोणी स्कॅमर आहे हे यामुळे लक्षातच येत नाही. यावरच आता सरकारने उपाय शोधला आहे.

केंद्रीय वित्तसचिवांनी याबाबत 12 प्रमुख कंपन्यांच्या स्टेकहोल्डर्ससोबत एक बैठक आयोजित केली होती. यामध्ये सायबर फसवणूक आणि त्यावरील उपायांबाबत चर्चा करण्यात आली. यानंतर सरकारने बँका आणि वित्तीय संस्थांना असे निर्देश दिले, की त्यांनी कमर्शिअल-प्रमोशनल कॉल्स करण्यासाठी 10 अंकी नाही तर 6 अंकी मोबाईल नंबर वापरावे. यासोबतच या संस्थांनी जागरुकता अभियान चालवावे असंही सरकारने म्हटलं आहे.

अस्त्र एआय इंजिन

केंद्राच्या टेलिकम्युनिकेशन्स विभागाने अस्त्र नावाचं एक एआय/एमएल आधारित इंजिन तयार केलं आहे. फेक आयडी आणि खोटी कागदपत्रं वापरून घेतलेल्या मोबाईल कनेक्शनचा शोध लावण्यासाठी हे सर्च इंजिन मदत करतं. याच्या मदतीने आतापर्यंत असे 1.40 लाख मोबाईल हँडसेट ब्लॉक करण्यात आले आहेत. एबीपीने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

Cyber Crime mobile
Internet Safety Tips : इंटरनेटवर कसं रहायचं सुरक्षित? या सोप्या टिप्स ठरतील लाखमोलाच्या..

बल्क मेसेज

टेलिकॉम विभागाने बल्क एसएमएस पाठवणाऱ्या 35 लाख प्रिन्सिपल एंटिटीजचा शोध लावला आहे. यातील 19,776 एंटीटीज अशा होत्या ज्या फ्रॉड एसएमएस पाठवत होत्या. या सर्व संस्थांना ब्लॅकलिस्ट करण्यात आलं आहे. सोबतच 30,700 एसएमएस हेडर्स आणि 1,95,766 एसएमएस टेम्पलेट डिस्कनेक्ट करण्यात आले आहेत.

एप्रिल 2023 पासून सरकारने आतापर्यंत 70 लाख मोबाईल कनेक्शन डिस्कनेक्ट केले आहेत. हे सर्व कनेक्शन सायबर गुन्ह्यांमध्ये वापरण्यात आले होते. सोबतच सरकारने या कालावधीत सुमारे 900 कोटी रुपयांची फसवणूक टाळली आहे, ज्यामुळे 3.5 लाख लोकांना फायदा झाला.

Cyber Crime mobile
Google Chrome Update : हातातील कामं सोडा अन् तातडीने करा 'गुगल क्रोम' अपडेट! सरकारचा गंभीर इशारा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com