Data Leak: अवघ्या ४९० रुपयात होतेय भारतीयांच्या खासगी माहितीची विक्री, तुमच्या डेटाचा तर समावेश नाही ना?

६ लाखांपेक्षा अधिक भारतीय यूजर्सच्या खासगी माहितीची ऑनलाइन विक्री होत आहे. बोट मार्केटमध्ये हा डेटा खरेदीसाठी उपलब्ध आहे.
Data leak
Data leakSakal
Updated on

6 Lakh Indians Data Leak: सायबर गुन्हेगार लोकांची फसवणूक करण्यासाठी वेगवेगळे मार्ग शोधत असतात. स्मार्टफोन, सोशल मीडियावरून यूजर्सची खासगी माहिती चोरून याची विक्री केली जात आहे. सध्या डेटा हा सर्वाधिक महत्त्वाचा झाला आहे. यूजर्सची खासगी माहिती चोरून त्याची विक्री डार्क वेब व इतर ठिकाणांवर केली जाते. आता एक नवीन रिपोर्ट समोर आला असून, यात भारतीय यूजर्सचा डेटा चोरी करून विकला जात असल्याची माहिती समोर आली आहे.

या डेटा चोरीमध्ये भारतीय यूजर्सचा देखील समावेश आहे. बोट मार्केटमध्ये उपलब्ध असलेल्या डेटांमध्ये १२ टक्के माहिती ही भारतीय यूजर्सची आहे. येथे एका भारतीयाच्या डेटाची विक्री केवळ ४९० रुपयात होत आहे. याबाबत सायबर सिक्योरिटी कंपनी NordVPN ने माहिती दिली आहे.

हेही वाचा: Moonlighting And Tax Benefits : ‘मूनलायटिंग’च्या वाटे, नको ‘टॅक्स’चे काटे!

बोट मार्केट हे ऑनलाइन मार्केटप्लेस आहे. येथे हॅकर्स यूजर्सच्या डिव्हाइसमधून चोरी केलेल्या माहितीची विक्री करतात. हा डेटा बोट मॅलवेअरच्या माध्यमातून चोरी केले जातो. या डेटामध्ये डिजिटल फिंगरप्रिंट, स्क्रीनशॉट, कुकीज, लॉग इन डिटेल्स आणि इतर माहितीचा समावेश असतो. जगभरातील जवळपास ५० लाख लोकांचा डेटा आता विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. यात ६ लाख भारतीय यूजर्स आहेत.

फक्त ४९० रुपयात होतेय डेटाची विक्री

रिपोर्टनुसार, ५० लाख लोकांची खासगी माहिती बोट मार्केटवर उपलब्ध आहे. या डेटाची सरासरी किंमत ४९० रुपये आहे. जवळपास २६.६ मिलियन चोरी करण्यात आलेल्या लॉग इन्सची माहिती समोर आली आहे. यात ७२०,००० गुगल लॉग इन्स, ६५४,००० मायक्रोसॉफ्ट लॉग इन्स आणि ६४७०,०० फेसबुक लॉग इन्सचा समावेश आहे.

Data leak
Maruti suzuki: खिशाला परवडणारी कार! माइलेजही ३४ किमी, ४० हजार रुपये स्वस्तात खरेदीची संधी

डिजिटल बोट्स धोकादायक

डिजिटल बोट्सचे प्रमाण वाढले आहे. याचा वापर कस्टमर सर्व्हिस, सर्च इंजिन ऑप्टिमाइजेशन आणि मनोरंजनाच्या क्षेत्रात केला जातो. मात्र, काही बोट्स धोकादायक असतात. RedLine, Vidar, Racoon, Taurus आणि AZORult असेच काही धोकादायक मॅलवेअर आहेत, जे यूजर्सची माहिती चोरून विक्री करतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com