Maruti suzuki: खिशाला परवडणारी कार! माइलेजही ३४ किमी, ४० हजार रुपये स्वस्तात खरेदीची संधी

Maruti Suzuki ची सर्वात लोकप्रिय कार WagonR वर आकर्षक ऑफर उपलब्ध आहे. या कारला ४० हजारांच्या बंपर डिस्काउंटसह खरेदी करता येईल.
Maruti Suzuki
Maruti SuzukiSakal
Updated on

Maruti Suzuki WagonR Offer: कार खरेदी करताना सर्वात प्रथम आपण माइलेजबाबत जाणून घेत असतो. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे जास्त माइलेज देणारी गाडी तुमच्याकडे असल्यास फायद्याचे ठरते. तुम्ही जर जास्त माइलेज देणारी कार शोधत असाल तर Maruti Suzuki WagonR एक चांगला पर्याय ठरेल. ही कार ३४ किमी माइलेज देते. मारुती सुझुकी या हॅचबॅक कारवर बंपर डिस्काउंट देत आहे. कारवरील ऑफरविषयी सविस्तर जाणून घेऊया.

हेही वाचा: Moonlighting And Tax Benefits : ‘मूनलायटिंग’च्या वाटे, नको ‘टॅक्स’चे काटे!

Maruti Suzuki WagonR
Maruti Suzuki WagonRSakal

Maruti Suzuki WagonR ची किंमत

मागील महिन्यात Maruti Suzuki WagonR च्या १७,९४५ यूनिट्सची विक्री झाली असून, यासोबतच ही देशातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. कंपनी या कारवर ४० हजार रुपये डिस्काउंट देत आहे. यामध्ये २० हजार रुपयांपर्यंत कॅश बोनस, १५ हजार रुपये अतिरिक्त बोनस आणि ५ हजार रुपयांपर्यंत कार्पोरेट डिस्काउंटचा समावेश आहे. मारुती वॅगनआरची सुरुवाती एक्स-शोरुम किंमत ५.४७ लाख रुपये आहे. तर टॉप व्हेरिएंटची एक्स-शोरुम किंमत ७.२० लाख रुपये आहे.

Maruti Suzuki
BMW Car: सोनू सूदचा थाटच वेगळा! ०००७ नंबरसह खरेदी केली BMW, जाणून घ्या किंमत-फीचर्ससह संपूर्ण माहिती

Maruti Suzuki WagonR चे फीचर्स

Maruti Suzuki च्या या हॅचबॅक कारमध्ये ७ इंच टचस्क्रीन डिस्प्ले दिला आहे. याशिवाय, ४ स्पीकर म्यूझिक सिस्टम, स्टेअरिंग माउंटेड ऑडिओ आणि फोन कंट्रोल सारखे फीचर्स मिळतात. यात १४ इंच एलॉय व्हील देण्यात आले आहेत. तर सेफ्टी फीचर्समध्ये ड्यूल फ्रंट एअरबॅग, ईबीडीसह एबीएस, रियर पार्किंग सेंसर आणि हिल होल्ड असिस्टचा समावेश आहे.

Maruti Suzuki WagonR दोन पेट्रोल इंजिन पर्यायासह येते. याचे एक इंजिन १ लीटर असून, जे ६७ पीएस पॉवर आणि ८९ एनएम टॉर्क जनरेट करते. तर १.२ लीटर इंजिन ९० पीएस पॉवर आणि ११३ एनएम टॉर्क जनरेट करते. दोन्ही इंजिन ५-स्पीड मॅन्यूअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह येतात. विशेष म्हणजे तुम्हाला सीएनजीचा देखील पर्याय मिळेल. कारचे सीएनजी मॉडेल ३४ किमी माइलेज देते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com