Data Storing Platform : डेटा स्टोअरींगचा प्रॉब्लेम येतोय? आता ‘ब्रिक’ प्लॅटफॉर्मवर स्टोअर करा मोठ्या फाइल्स

आता मोठा डेटा कुठे स्टोअर करण्याची आणि हलविण्याची समस्या सुटली आहे.
Data Storing Platform
Data Storing Platformesakal

Data Storing Platform : डिजिटल युगात तयार होणारा बिग डेटा आता ‘ब्रिक'' प्लॅटफॉर्मच्या माध्यमाने एका जागेहून दुसऱ्या जागी सहज कॅप्चर, स्टोअरची प्रक्रिया करून वाहून नेता येतो. ४० जीबी प्रतिसेकंदाच्या स्पीडने डेटा ट्रान्स्फर करण्याची क्षमता या प्लॅटफॉर्ममध्ये आहे. तब्बल १ पेटाबाईट म्हणजेच दहा लक्ष जीबीपर्यंतचा डेटा यात साठवता येऊ शकतो. साहिल चावला याने संशोधन करून डेटा स्टोअर करण्यासाठी ‘ब्रिक’ हे स्टार्ट अप सुरू केले आहे.

डिजिटलायझेशन झपाट्याने होत असताना डेटा मोबिलीटीच्या सुरक्षेचे आव्हान देशासमोर उभे ठाकले आहे. ‘ब्रिक’ हे प्लॅटफॉर्ममुळे देशाच्याच नव्हे तर जगाच्या कोणत्याही टोकावरून क्लाउडवर डेटा सुव्यवस्थितपणे हलविण्याच्या आव्हानांना पेलू शकते. त्यामुळे आता मोठा डेटा कुठे स्टोअर करण्याची आणि हलविण्याची समस्या सुटली आहे.

त्यामुळेच ब्रिक विविध संस्थांना त्यांच्या प्रक्रिया सुरक्षितपणे आणि जलदपणे डिजिटायझसाठी मदतनीस ठरत आहे. यामुळे कितीही मोठा डाटा सुरक्षितरित्या ठेवता येणार आहे.

टीसेंकड जनरेशन टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेडचे हे स्टार्ट अप आहे. या कंपनीने याचे पेटंट घेतले आहे. टीसेंकड असे नाव त्या कंपनीला सार्थ ठरले आहे. डेटासाठी कॅप्चर-प्रक्रिया साठवणुकीसाठी सुव्यवस्थित करण्यासाठी भारत सरकार आणि संरक्षण संस्थांसोबत काम करत आहे. जागतिक स्तरावर, टीसेंकड बोइंग, रेड डिजिटल सिनेमा आणि स्ट्रीमलँड मीडियासाठीही काम करीत आहे. या सर्वच कंपन्यांमध्ये ब्रिक फ्लॅटफॉर्म सज्ज आहे.

Data Storing Platform
Apple Offline Store : 'या' प्लॅटफॉर्मवर अॅपल स्टोअरपेक्षाही स्वस्त मिळणार आयफोन

डेटा साठविण्याची समस्या अनेक वर्षांपासून भेडसावत होती. ती समस्या लक्षात घेऊन ब्रिक प्लॅटफॉर्म विकसित केले. भारतातील नव्हे तर विदेशातील कंपन्यांसाठीही हे उपयोगी ठरू लागले आहे. (Technology)

Data Storing Platform
Science Technology News: आता विचारही साठवून ठेवता येणार; यांचाही डेटासारखाच वापर होणार का?

ब्रिक प्लॅटफॉर्मचे वैशिष्ट्य

दुर्गम स्थानावरून डेटा कॅप्चर करणे, साठवणूक करणे आणि इतरत्र पाठविता येतो.

४० जीबी डाटा एका सेंकदात कुठल्याही क्लाऊड डाटा सेंटरवर पाठविता येतो.

ट्रे (डॉकिंग स्टेशन) आहे जो मानक इथरनेट केबलद्वारे (पीसीआयई) जोडता येऊ शकतो.

ब्रिक प्लॅटफॉर्म पोर्टेबल स्टोअरेज आणि डेटा ट्रान्स्फर युनिट आहे.

या डीव्हाईसचे वजन केवळ सहा किलो असून सहज हातामध्ये पकडता येऊ शकतो, एवढ्या आकाराचा आहे.

यामध्ये बायोस प्रणाली असल्याने वापरण्यास सोपी आहे.

यातील सॉफ्टवेअर स्वयं-अपडेटेड होणारे असून एईएस २५६ - बिट्स एन्क्रिप्टेड आहे. त्यामुळे यात स्टोअर डेटामध्ये कोणत्याही प्रकारची छेडखानी करता येत नाही.

हे डिव्हाईस जलरोधक आणि शॉक प्रतिरोधक आहे.

तीव्र तापमान सहन करण्याची क्षमता देखील यामध्ये आहे.

विविध स्टोरेज क्षमतेच्या सेगमेंटमध्ये हा प्लॅट फॉर्म उपलब्ध आहे.

-साहील चावला, को-फाऊंडर, मुख्य कार्यकारी अधिकारी, टीसेंकड

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com