
चीन मध्ये उगम पावलेले DeepSeek नामक AI स्टार्टअप, ज्याने आपल्या R1 मॉडेलमुळे जागतिक स्तरावर लोकप्रियता मिळवली, त्या कंपनीने काही महत्त्वाच्या कर्मचाऱ्यांचे पासपोर्ट जप्त केले असल्याचे चित्र समोर आले आहे. The Vergeच्या AI रिपोर्टर कायली रॉबिन्सन यांनी दिलेल्या माहितीनुसार, The Informationच्या अहवालात असे नमूद केले आहे की DeepSeek चे अभियंते चीनबाहेर जाऊ शकत नाहीत. या निर्बंधामुळे कंपनीतील संवेदनशील डेटा सुरक्षित राहील,अशी चीन सरकारची भूमिका आहे.या निर्णयामुळे DeepSeek अभियंत्यांना प्रवास निर्बंध लागू झाले,जे पुढे अमर्यादित काळा पर्यंत राहतील . अशा कठोर पाउलांमुळे चीन मध्ये नकळत चालू असलेली हुकूमशाही समोर येते.