

DeepSeek Security Concerns: Countries like South Korea, Australia, Italy, Netherland bans or restrict Deepseek privacy issue Data Protection
DeepSeek ने कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रातली अमेरिकेच्या दादागिरीला सुरुंग लावला खरा पण चीनच्या एकूणच कृत्यांमुळे आणि त्यांच्या पूर्वकर्मांमुळे डीपसीकच्या सुरक्षेविषयीही जगभरातील विविध सरकारांनी चिंता व्यक्त केली आहे.
ऑस्ट्रेलिया, इटली, आयर्लंड, दक्षिण कोरिया किंवा नेदरलँड्स यासारख्या अनेक देशांनी सरकारी माहिती आणि सुरक्षेचा विचार करता डीपसीककडे वक्रदृष्टी वळवलीय.
सरकारी उपकरणांवर या डीपसीकचा वापर करण्यास बंदी घालण्यात येत आहे. डीपसीकद्वारे डेटा संकलन पद्धती, संभाव्य सेन्सॉरशिप आणि संवेदनशील माहिती चिनी सरकारला हस्तांतरित होण्याचा धोका जगभरातल्या देशांना जाणवतो आहे.