सावधान! गुगल प्ले स्टोअरने हटवलेली 17 Apps, तुमच्या फोनमध्ये नाहीत ना?

सकाळ न्यूज नेटवर्क
Sunday, 13 September 2020

जुलै ते सप्टेंबरच्या दरम्यान दुसऱ्या आठवड्यात गुगलने प्ले स्टोअरवरुन १७ व्हायरस असणाऱ्या अॅप्सना काढून टाकलं होतं

जुलै ते सप्टेंबरच्या दरम्यान दुसऱ्या आठवड्यात गुगलने प्ले स्टोअरवरुन १७ व्हायरस असणाऱ्या अॅप्सना काढून टाकलं होतं. यामधील ११ अॅप्सना जुलै महिन्यात तर उर्वरित सहा अॅप्सना मागच्या आठवड्यात काढून टाकलं आहे. हे १७ अॅप्स सध्या गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध नाहीयत. त्यामुळे या अॅप्सना डाऊनलोड केले जाऊ शकत नाही. या १७ अॅपवर नविन व्हेरियंट मालवेअर जोकर हा व्हायरस सापडला होता. 

चेक पॉईंटच्या रिसर्चर्सनी जुलैमध्ये ११ अशा अॅप्सना शोधून काढलं होतं ज्यात व्हायरस डिटेक्ट झाला होता. रिपोर्टनुसार गुगल या अॅप्सवर २०१७ पासून लक्ष ठेवून होते. ११ अॅप्सना काढून टाकल्यानंतर नविन ६ अॅप सापडले ज्यात खतरनाक जोकर मालवेअर होते. सध्या या अॅप्सनाही प्लेस्टोअरवरुन काढून टाकले आहे. 

गलवानमध्ये चीनचे किती सैनिक मारले गेले? अमेरिकेच्या वर्तमानपत्राने केला दावा

सायबर सिक्यूरीटी फर्मच्या म्हणण्यानुसार प्लेस्टोअरवरुन काढून टाकण्याआधी या ६ अॅप्सना जवळपास २००,००० वेळा डाऊनलोड केलं गेलं आहे. 

पाहूयात हे १७ अॅप कोणते आहेत...

>>com.imagecompress.android
>>com.contact.withme.texts
>>com.hmvoice.friendsms
>>com.relax.relaxation.androidsms
>>com.cheery.message.sendsms
>>com.peason.lovinglovemessage
>>com.file.recovefiles
>>com.LPlocker.lockapps
>>com.remindme.alram
>>com.training.memorygame
>>Safety AppLock
>>Convenient Scanner 2
>>Push Message- Texting & SMS
>>Emoji Wallpaper
>>Separate Doc Scanner
>>Fingertip GameBox

हे १७ अॅप्स गुगल प्लेस्टोअर नसले तरी आपल्या मोबाईलमध्ये असू शकतात. जर आपल्या मोबाईलमध्ये असतील तर तातडीने ते डिलीट करा.

भारत


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Delete This Virus Affected Apps From Your Mobile