Delhi Artificial Rain : प्रदूषणाला आळा घालण्यासाठी दिल्लीत पाडणार कृत्रिम पाऊस; काय आहे केजरीवाल सरकारचा प्लॅन?

Delhi Pollution : जर ठरलेल्या दिवशी आकाशात ढग असतील, आणि सरकारला आवश्यक त्या सर्व परवानग्या मिळाल्या; तर ही योजना पुढे नेली जाईल.
Delhi Artificial Rain
Delhi Artificial RaineSakal

दिल्ली-एनसीआरमध्ये प्रदूषणाची पातळी धोक्याच्या वर गेली आहे. यामुळे शाळांना देखील सुट्ट्या देण्यात आल्या आहेत. प्रदूषणाचा धोका कमी होत नसल्यामुळे आता केजरीवाल सरकार शहरात कृत्रिम पाऊस पाडण्याचा विचार करत आहे.

दिल्लीचे पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी बुधवारी एक बैठक बोलावली होती. त्यानंतर त्यांनी आर्टिफिशिअल रेन, म्हणजेच कृत्रिम पावसाच्या योजनेची घोषणा केली. दिल्लीमध्ये 20 आणि 21 नोव्हेंबर या दिवशी कृत्रिम पाऊस पाडला जाऊ शकतो, असं त्यांनी स्पष्ट केलं.

जर ठरलेल्या दिवशी आकाशात ढग असतील, आणि सरकारला आवश्यक त्या सर्व परवानग्या मिळाल्या; तर ही योजना पुढे नेली जाईल. याबाबत पुढील मंगळवारी IIT कानपूर आणि दिल्ली सरकारमधील मंत्र्यांची बैठक पार पडणार आहे. यासोबतच शुक्रवारी सरकार याबाबत सर्वोच्च न्यायालयाला देखील माहिती देणार आहे.

Delhi Artificial Rain
Air Purifier Offers : हवा प्रदूषणाचं घेऊ नका टेन्शन, या दिवाळीला खरेदी करा स्वस्तात मस्त एअर प्युरिफायर! पाहा ऑफर्स

दिल्लीमध्ये निर्बंध लागू

दिल्लीमधील हवेची गुणवत्ता धोकादायक पातळीवर आली आहे. तिथल्या हवेचा AQI हा 500 पेक्षा जास्त आहे. दिल्लीमध्ये 9 ते 18 नोव्हेंबरपर्यंत शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गाड्यांसाठी ऑड-इव्हन फॉर्म्युला लागू करण, तसंच दुसऱ्या राज्यातील टॅक्सींना दिल्लीमध्ये प्रवेश नाकारणे याबाबत देखील चर्चा सुरू आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com