

Jaish e Mohammed doctors behind Delhi bomb blast using dead drop email technique revealed
esakal
Dead Drop E-Mail : राजधानी दिल्लीला हादरवून टाकणाऱ्या लाल किल्ल्याजवळील भयानक बॉम्बस्फोटाच्या तपासात सुरक्षा यंत्रणांना मोठा यश मिळाला आहे. 10 नोव्हेंबर रोजी झालेल्या या स्फोटात एका आय20 कारचा भीषण स्फोट झाला, ज्यात 13 निष्पाप लोकांचा मृत्यू झाला आणि जवळपास 24 जण गंभीर जखमी झाले. आता उघड झालेल्या माहितीनुसार, हा कट रचणाऱ्या दहशतवाद्यांनी अत्यंत चलाख 'डेड ड्रॉप' ईमेल तंत्राचा वापर केला होता. हे तंत्र इतके गुप्त आहे की, पोलिसांना ट्रेस करणेही कठीण जाते