डेंगी रोखणारे डास विकसित

वृत्तसंस्था
गुरुवार, 1 डिसेंबर 2016

जागतिक आरोग्य संघटनेने प्रकाशित केलेल्या अहवालानुसार डास हा पृथ्वी वरील सर्वांत धोकादायक "प्राणी'असल्याचे सिद्ध झाले आहे. मलेरिया, डेंगीसारखे आजार फैलावणाऱ्या डासांमुळे जगभरात दर वर्षी दहा लाख लोकांचा मृत्यू होतो, असा अंदाज आहे.

डासांच्या नायनाटासाठी अनेक प्रयत्न केले जात असले, तरी त्यात पुरेसे यश आलेले नाही. आता ब्राझीलने डासांशी संबंधित आजारांचा सामना करण्यासाठी जनुकीय फेरफार केलेल्या डासांचा प्रसार सुरू केला आहे. काट्याने काटा काढण्यासारखाच हा प्रकार आहे.

"ऑक्‍झिटेक'या ब्रिटनमधील कंपनीकडून या डासांची निर्मिती केली जात आहे. ब्राझीलमध्ये पुढील आठवड्यापासून या डासांचा प्रसार वाढविण्यासाठी एक कारखाना सुरू होत आहे. जनुकीयरीत्या विकसित डास तयार करण्यासाठी नर डासांमध्ये घातक जनुक सोडण्यात येईल. हे डास लैंगिकदृष्ट्या परिपक्व होण्याआधीच मृत्युमुखी पडतील व त्यामुळे पुनरुत्पादन करू शकणार नाहीत.

डासांच्या मादींनी या विशेष विकसित केलेल्या नर डासांची निवड केल्यामुळे नव्याने जन्मणारे डासही पुनरुत्पादन करण्यापूर्वीच मरतील. त्यामुळे डासांच्या संख्येत
अत्यंत कमी वेळेत लक्षणीय घट होईल,असा दावा करण्यात येत आहे. या डासांमध्ये सोडलेले घातक जनुक मनुष्याच्या शरीरात प्रवेश करू शकणार नाही. त्यामुळे विकसित डासांचे हे तंत्र माणसासाठी सुरक्षित असल्याचेही सांगण्यात आले.
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dengue mosquitoes developed to occur