सरकारचा मोठा निर्णय: जॅमर, नेटवर्क बूस्टरवर बंदी, खरेदी-विक्रीही बेकायदेशीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 internet

सरकारचा मोठा निर्णय: जॅमर, नेटवर्क बूस्टरवर बंदी, खरेदी-विक्रीही बेकायदेशीर

नवी दिल्ली : भारत सरकारने जॅमर, नेटवर्क बूस्टर (Internet Booster) आणि रिपाटर्सच्या वैयक्तिक वापरावर बंदी घातली आहे. दूरसंचार विभाग आणि दळणवळण मंत्रालयाने 1 जुलै 2022 रोजी वायरलेस जॅमर आणि बूस्टर/रिपीर्टरच्या वैयक्तिक वापराबाबत मार्गदर्शकतत्वे जारी केले आहेत. भारत सरकारच्या (Indian Government) परवानगीशिवाय जॅमर, जीपीएस ब्लॉकर्स किंवा इतर सिग्नल जॅमिंग (Signal Jamming) उपकरणांचा वापर बेकायदेशीर असल्याचे यामध्ये स्पष्ट करण्यात आले. तसेच याच्या खाजगी खरेदी-विक्रीवरही पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. सेल्युलर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडियाने (COAI) सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. (Internet Jammer News In Marathi )

कोणत्याही साइट सिग्नल जॅमिंग उपकरणांवर जाहिरात करणे, विक्री करणे, वितरण करणे, आयात करणे किंवा विक्रीसाठी यादी करणे भारतात बेकायदेशीर असल्याचे जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये नमूद करण्यात आले आहे. परवानाधारक दूरसंचार सेवा प्रदात्यांव्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्ती/संस्थेद्वारे मोबाइल सिग्नल रिपीटर/बूस्टर बाळगणे, विकणे किंवा वापरणे बेकायदेशीर असल्याचेही यामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.

COAI ने म्हटले आहे की, 'सिग्नल रिपीटर्स/बूस्टरच्या स्थापनेमुळे उद्भवणाऱ्या आव्हानांचा सामना करण्यासाठी DoT च्या सल्ल्याचे स्वागत करतो. मोबाईल सिग्नल बूस्टर (MSB) खरेदी करणे, विक्री करणे, इन्टॉल करणे आणि ठेवणे हा वायरलेस टेलिग्राफी कायदा, 1933 आणि इंडिया टेलिग्राफ कायदा, 1885 अंतर्गत बेकायदेशीर आणि दंडनीय गुन्हा आहे हे नागरिकांना माहिती नाही. त्यामुळे याचा दूरसंचार सेवांवर विपरित परिणाम होत आहे.

Web Title: Department Of Telecommunications Banned On Use Of Wireless Jammer And Booster

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :IndiaInternet
go to top