स्मार्टफोनचे व्यसन सोडण्यासाठी आता 'सबस्टिट्यूट फोन'

वृत्तसंस्था
बुधवार, 29 नोव्हेंबर 2017

व्हिएन्ना - स्मार्टफोनचे दुष्परिणाम काही नवीन नाही. अनेकांना स्मार्टफोनचे ऍडिक्शनच असते. तुम्हालाही असे स्मार्टफोनचे ऍडिक्शन असेल तर त्यापासून सुटका करुन घेणे आता शक्य होणार आहे. त्यासाठी ऑस्ट्रियातील क्लेमेन्स शिलिंगर या डिझायनरने काही फोन डिझाईन केले आहे. त्याला 'सबस्टिट्यूट फोन' म्हणातात.  

या सबस्टिट्यूट फोनमध्ये छोट्या मण्यांचा वापर केला आहे. या मण्यांना स्मार्टफोन अनलॉक, स्विपींग, झूमिंग, स्क्रोलिंग, स्लायडिंग अशा मोशन देण्यात आल्या आहेत. परंतु, त्यामुळे एखाद्या खेळण्यासारखा जेव्हा तुम्हाला स्मार्टफोन ऑपरेट करण्याची इच्छा झाल्यास याचा वापर करता येईल. 

इटालियन लेखक अम्बर्टो इको यांनी आपल्याला असे फोन तयार करण्यसाठी प्रोत्साहन दिल्याचे शिलिंगर यांनी सांगितले. इको यांनी स्वत: सिगारेटचे व्यसन सोडण्यासाठी अशा प्रकारे व्यसन सोडण्यासाठी मिळणाऱ्या सबस्टिट्यूट साधनांचा वापर केला होता. त्यामुळे स्मार्टफोनचे व्यसन असणाऱ्यांसाठी अशा सबस्टिट्यूट फोनचा वापर करया येईल असे त्यांचे मत आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Designer Creates “Substitute Phone” to Help People Battle Smartphone Addiction