4G, 5G आणि 6G मध्ये नेमका फरक तरी काय? जाणून घ्या

5G व्यतिरिक्त, 6G देखील विकासाधीन आहे आणि त्याच्या सेवा 2030 च्या अखेरीस सुरू होण्याची अपेक्षा आहे.
difference between 4G, 5G and 6G
difference between 4G, 5G and 6GSakal

Difference between 4G, 5G and 6G: मागच्या अनेक वर्षात मोबाईल नेटवर्क्समध्ये बरीच सुधारणा झाली आहे. 2G म्हणता म्हणता 3G, 4G लाँच झालं, आता तर 5G आणि 6G जमाना आला आहे. 4G लाँच होऊनही आता 10 वर्षांचा काळ लोटला. सगळ्यात आधी एअरटेलने 4G कनेक्शन लाँच केलं होतं. जग अतिशय फास्ट पुढे जातंय अशात नेटवर्क्स कशी मागे राहतील.

गेल्या महिन्यात, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्टार्टअप्स आणि उद्योग क्षेत्रातील लोकांना त्यांच्या त्यांच्या उत्पादनांची स्थानिक पातळीवर चाचणी घेण्यासाठी आणि परदेशी सुविधांवरचे अवलंबून असणे कमी करण्यासाठी देशातील पहिल्या 5G टेस्टबेडचे उद्घाटन केले. या टेस्टबेडची स्थापना सुमारे 220 कोटी रुपये खर्चून करण्यात आलीय आणि भारतीय उद्योग आणि स्टार्टअपसाठी एक सपोर्टीव्ह इकोसिस्टम म्हणून काम करेल अशी आशा व्यक्त केली. 5G व्यतिरिक्त, 6G देखील विकासाधीन आहे आणि त्याच्या सेवा 2030 च्या अखेरीस सुरू होण्याची अपेक्षा आहे.

4G नेटवर्क नेमकं काय?

4G हे चौथ्या जनरेशनचे वायरलेस कनेक्टिव्हिटीचे संक्षिप्त रूप आहे ज्याने 3G (थर्ड-जनरेशन वायरलेस) कनेक्टिव्हिटीची जागा घेतली. वायरलेस सेल्युलर तंत्रज्ञानात जसे जनरेशनमध्ये बदल होतो तसाच बदल बँडविड्थ स्पीड (bandwidth speed) आणि नेटवर्क क्षमतेतही होतो आहे अर्थात ती वाढते. उदाहरणार्थ. 3G ने 14 Mbps चा स्पीड ऑफर केला तर 4G ने 100 Mbps पर्यंतचा वेग दिला. हाय-डेफिनिशन व्हिडिओ आणि ऑडिओ 4G मध्ये अगदी चुटकीसरशी डाउनलोड करता येतात. शिवाय, यामुळे वायरलेस ब्रॉडबँड सक्षम केलं. इंटरनेट सेवा देणाऱ्याकडून (ISP) वायर्ड कनेक्शनची आवश्यकता नसताना इंटरनेट कनेक्टिव्हिटी मिळू शकते. 4G कनेक्शन रेडिओ फ्रिक्वेन्सी प्रसारित करण्यासाठी अँटेना वापरते, ज्यामुळे मोबाइल डिव्हायसेस नेटवर्कशी कनेक्ट होते.

difference between 4G, 5G and 6G
कमी पैशात जास्त वॅलिडिटी! या 3 रिचार्ज प्लॅनसमोर Jio-Airtel फेल

4G पेक्षा 5G वेगळे कसे?

5G अर्थात फिफ्थ जनरेशन ही सेल्युलर नेटवर्कची पाचवी पिढी आहे जी 4G पेक्षा 100 पट वेगवान आहे. यामुळे लोकांसह व्यवसायांसाठी संधी निर्माण करेल अशी अपेक्षा आहे. नेटवर्क क्षमतेत वाढ महत्त्वाची आहे कारण डेटा ट्रॅफिक दरवर्षी सुमारे 60 टक्क्यांनी वाढत आहे.

एखाद्या गर्दीच्या ठिकाणी, एखाद्या स्पोर्ट्स इव्हेंटच्या ठिकाणी 4G नेटवर्कला एकावेळी अनेक उपकरणे (Devices) हाताळताना काही समस्यांना तोंड द्यावे लागले, जी समस्या 5G मध्ये येणार नाही कारण 5G अंतर्गत एकाच वेळी 10 लाख उपकरणे (Devices) हाताळण्यास सक्षम आहे.

5G नेटवर्क केवळ स्मार्टफोनच नाही तर इतर विविध प्रकारच्या उपकरणांनाही जोडण्यासाठी डिझाइन केले आहे. शिवाय 5G कनेक्‍शन नेटवर्क हे --- AR-फिल्टर किंवा गेम सारख्या क्लिष्ट प्रोसेसिंग हाताळण्यास सक्षम आहे जे फोनचा परफॉर्मंस आणि बॅटरीवर परिणाम करतात. यात फोन स्लो झाला यासारख्या समस्या येणार नाहीत.

नेटवर्क स्लाइसिंग तंत्रज्ञानाचा (network slicing technology) वापर करून 5G नेटवर्क एकाच वेळी अनेक वेगळे नेटवर्क म्हणून काम करु शकते. म्हणजे नेटवर्कचा एक भाग एका विशिष्ट हेतूसाठी डिझाइन केला जाऊ शकतो आणि स्वतंत्र नेटवर्क म्हणून काम करू शकतो.

difference between 4G, 5G and 6G
घरात वाय-फाय आहे, मग हे रिचार्ज प्लॅन वाचवतील तुमचे भरपूर पैसे

5G हे 6G टेक्नोलॉजी पेक्षा 6G वेगळे कसे?

6G टेक्नोलॉजी 5G तंत्रज्ञानापेक्षा अधिक प्रगत आहे, जी 1Tbps किंवा 8,000 Gbps स्पीड देण्याचा दावा करते. उदाहरणार्थ, तुम्ही 6G नेटवर्कसह प्रत्येक सेकंदाला नेटफ्लिक्सचे 142 तासांचे हाय डेफिनिशन व्हिडिओ डाउनलोड करू शकता. हे नेटवर्क 5G पेक्षा वेगळे स्पेक्ट्रम वापरतं.

5G पेक्षा 6G 100 पट वेगवान असण्याची शक्यता आहे. याव्यतिरिक्त, 6G प्रति चौरस किलोमीटर दहापट अधिक उपकरणंही (devices) कनेक्ट करू शकते कारण आगामी वर्षांत कनेक्ट केल्या जाणाऱ्या उपकरणांची संख्या वाढेल.

शिवाय, 4G नेटवर्कने सुमारे 50 मिलीसेकंद लेटन्सी (latency) दिली, तर 5G नेटवर्क 4G पेक्षा दहापट लोवर लेटन्सी देतं. 6G च्या बाबतीत, लेटन्सी 1 मिलीसेकंद ते 1 मायक्रोसेकंद असण्याची शक्यता आहे ज्यामुळे एका सेकंदापेक्षा कमी वेळेत प्रचंड डेटा ट्रान्समिशन होऊ शकेल.

6G या आगामी नेटवर्क तंत्रज्ञानामुळे सध्याच्या नेटवर्कमधील कमतरता दूर करणे, नेटवर्क डिझाइन सुधारणे आणि नेटवर्क ऑप्टिमाइझ करणे अपेक्षित आहे. प्रगत AI प्रणाली आणि स्ट्राँग एज कॉम्प्युटिंग गुंतागुंतीच्या सिस्टमशी समन्वय साधण्यासाठी आणि अखंड इंटरनेट कनेक्टिव्हिटी विकसित करण्यासाठी 6G चा वापर करेल. टेक दिग्गज जसे की Google, Apple आणि Samsung इतर सर्व 5G नेटवर्कची जागा घेणारे हे तंत्रज्ञान विकसित करण्यावर काम करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com