घरात वाय-फाय आहे, मग हे रिचार्ज प्लॅन वाचवतील तुमचे भरपूर पैसे

jio airtel and vi best affordable plans for calling if you already have wifi connection in home
jio airtel and vi best affordable plans for calling if you already have wifi connection in home Recharge plan

जर तुम्ही जास्त डेटा वापरत नसाल किंवा तुमच्या घरात वाय-फाय आहे. तसेच तुम्हाला फक्त घराच्या बाहेर डेटासाठी मोबाईल रिचार्ज करावा लागत असेल तर आज आपण महात्वाची गोष्ट जाणून घेणार आहोत. येथे आज आपण Reliance Jio, Airtel आणि Vodafone-Idea (Vi) च्या अशाच काही स्वस्त प्रीपेड प्लॅन्स (Prepaid Plans) बद्दल सांगत आहोत. यामध्ये, एक वर्षापर्यंतच्या वैधतेसह, फ्री कॉलिंग आणि इंटरनेट वापरासाठी काही डेटा देखील उपलब्ध आहे. या प्लॅनचा मुख्य उद्देश कमी किमतीत तुमच्या एका वर्षासाठी कॉलिंगच्या गरजा पूर्ण करणे हा आहे. चला डिटेल्स जाणून घेऊया.

रिलायन्स जिओ (jio) चे तीन स्वस्त प्लॅन

जिओ आपल्या वापरकर्त्यांना तीन उत्तम स्वस्त योजना ऑफर करत आहे. हे प्लॅन 155 रुपये, 395 रुपये आणि 1559 रुपयांचे आहेत. 155 रुपयांच्या प्लॅनमध्ये, कंपनी 28 दिवसांच्या वैधतेसह देशभरातील कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग आणि 300 एसएमएस ऑफर करत आहे. या प्लॅनमध्ये Jio अॅप्सचे फ्री सबस्क्रिप्शन यासोबत इंटरनेट वापरासाठी 2GB डेटा देखील मिळतो.

त्याचप्रमाणे, 395 रुपयांच्या प्लॅनमध्ये, कंपनी 84 दिवसांची वैधता, अमर्यादित कॉलिंग आणि 1,000 मोफत एसएमएस व्यतिरिक्त 6 GB डेटा देत आहे. जर कंपनीच्या 1559 च्या प्लॅनबद्दल बोलायचे झाले तर यामध्ये तुम्हाला 336 दिवसांची वैधता, अनलिमिटेड कॉलिंग, 3600 फ्री एसएमएस आणि 24 जीबी डेटा मिळेल. या दोन्ही प्लॅन मध्ये तुम्हाला Jio अॅप्सच्या मोफत सब्सक्रिप्शन देखील मिळते.

jio airtel and vi best affordable plans for calling if you already have wifi connection in home
उभ्या गाड्यांनाही आगीचा धोका! Hyundai, Kia ने लाखो कार मागवल्या परत

Airtel चे तीन बेस्ट ऑप्शन

Airtel वापरकर्ते 155, 179 आणि 1799 रुपयांचे बजेट प्लॅन घेऊ शकतात. 155 रुपयांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला 24 दिवसांच्या वैधतेसह 300 फ्री एसएमएस, अमर्यादित कॉलिंग आणि 1 जीबी डेटा मिळेल. तसेच, कंपनी आपल्या 179 रुपयांच्या प्लॅनमध्ये फ्री कॉलिंग, 300 एसएमएस आणि 2 GB डेटा 28 दिवसांसाठी देत ​​आहे.

तुम्हाला 1799 रुपयांच्या प्लॅनमध्ये 365 च्या वैधतेसह देशभरातील कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग, 3600 फ्री एसएमएस आणि 24 जीबी डेटा मिळेल. या तीन प्लॅनची ​​खासियत म्हणजे तुम्हाला Amazon Prime Video च्या मोबाईल व्हर्जनचे 30 दिवसांसाठी मोफत टेस्टींग देखील मिळेल.

jio airtel and vi best affordable plans for calling if you already have wifi connection in home
रेडमी ने लॉंच केला स्वस्त स्मार्ट बँड, एका चार्जमध्ये चालतो 20 दिवस

Vodafone-Idea चे काही प्लॅन्स

Vodafone-Idea काही स्वस्त प्लॅन देखील ऑफर करत आहे ज्यात कॉलिंग आणि व्हॅलिडिटी बेनिफिट्स मिळतात, कंपनीच्या 149 रुपयांच्या प्लॅनमध्ये तुम्ही 21 दिवसांच्या वैधतेसह अमर्यादित कॉलिंग आणि 1 GB डेटा मिळतो. प्लॅनमध्ये मोफत एसएमएसचा लाभ दिला जात नाही. कंपनीचा पुढील प्लॅन 329 रुपयांचा आहे. यामध्ये 56 दिवसांसाठी फ्री कॉलिंग आणि 600 एसएमएससह 4 जीबी डेटाही दिला जात आहे. Voda आपल्या यूजर्सला Airtel प्रमाणेच 1799 रुपयांचा प्लॅन ऑफर करत आहे. या प्लॅनमध्ये इंटरनेट वापरासाठी 365 दिवसांची वैधता, 3600 एसएमएस, अमर्यादित कॉलिंग आणि 24 जीबी डेटा दिला जात आहे.

टीप: येथे या कंपन्यांच्या काही सर्वात स्वस्त प्लॅन्सबद्दल सांगितले आहे. मात्र, त्यांच्याकडे इतर काही यासारखेच प्लॅन देखील आहेत, जे तुम्ही कंपन्यांच्या वेबसाइटला भेट देऊन पाहू शकता आणि तुमच्या आवडीचा परवडणारा रीचार्ज प्लॅन निवडू शकता.

jio airtel and vi best affordable plans for calling if you already have wifi connection in home
'भगवा ध्वज भविष्यात राष्ट्रध्वज बनू शकतो..'; भाजप नेत्याचा दावा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com