Digital Payment: पुढील पाच वर्ष राहील UPI ची चलती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

UPI app

Digital Payment: पुढील पाच वर्ष राहील UPI ची चलती

नवी दिल्ली : एका रिपोर्टनुसार ऑनलाईन पेंमेंटच्या सेक्टरमध्ये पुढचे पाच वर्ष हे UPI चे असणार आहेत. PwC India च्या मते, युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI), Buy Now Pay Later (BNPL), सेंट्रल बँक डिजिटल करन्सी (CBDC) आणि ऑफलाइन पेमेंटमुळे पुढील पाच वर्षांमध्ये भारतात डिजिटल पेमेंटची वाढ होईल. पुढील काही वर्षे ऑनलाईन पेमेंटच्या सेक्टरमध्ये UPI चं मोठं योगदान असण्याची शक्यता आहे. त्यानंतर BNPL चा नंबर लागेल. असं या रिपोर्टमध्ये नोंदवण्यात आलं आहे.

इंडियन पेमेंट हँडबुक - 2021-26 च्या अहवालात नमूद केलं आहे की, भारतीय डिजिटल पेमेंट मार्केटच्या CAGR मध्ये 23 टक्के वाढ दिसून आली आहे, आणि आर्थिक वर्ष 2022 मध्ये 5900 कोटी असलेली वाढ आर्थिक वर्ष 2026 पर्यंत 21700 कोटीपर्यंत पोहचण्याची शक्यता आहे. 2020-21 मध्ये UPI व्यवहारांनी विक्रम हा 22 अब्ज पर्यंत गेला होता. जो 2025-26 पर्यंत 169 अब्ज (16,900 कोटी) पर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे.

हेही वाचा: Radio Aksh: दृष्टीहीनांसाठी देशातील पहिले रेडिओ केंद्र नागपुरात सुरु

अहवालानुसार, बीएनपीएलचा सध्या 363 अब्ज रुपयांच्या (36,300 कोटी रुपये) फायद्याचा अंदाज असून, जो 2025-26 च्या अखेरीस 3,191 अब्ज (3,19,100 कोटी) पर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. "आम्ही आशा करतो की पेमेंट उद्योगामुळे पुढील काही वर्षांमध्ये ग्राहकांचा अनुभव वाढेल, ग्राहक पर्याय, सुरक्षा, वितरित लेझर तंत्रज्ञान (डीएलटी), IOS आणि उदयोन्मुख तंत्र यांसारख्या नवसंकल्पनावर लक्ष केंद्रित केले जाईल." असं रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.

Web Title: Digital Online Payment Five Year Upi Bnpl Digital Currency

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top