PhonePe वर आलं भन्नाट फीचर! आता डेबिट कार्डशिवायही सुरू करा UPI खातं | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

phonepe

PhonePe वर आलं भन्नाट फीचर! आता डेबिट कार्डशिवायही सुरू करा UPI खातं

How To Activate UPI Account On Phonepe Without Debit Card : इन्स्टंट पेमेंट प्लॅटफॉर्म PhonePe खूप लोकप्रिय असून, ग्राहकांच्या सोयीसाठी आता कंपनीने एक नवीन भन्नाट फीटर जारी केले आहे. या फीचरचं वैशिष्ट म्हणजे यामध्ये डेबिट कार्डशिवाय युपीआय खातं सुरू करता येणार आहे.

Fraud

Fraud

हेही वाचा: Mahatma Gandhi : खाजवा डोकं! भारतीय नोटांवर गांधीजींचा परफेक्ट फोटो कुठून आला?

नव्या फीचरमध्ये युजरला आधार कार्ड ओटीपी प्रमाणीकरणाच्या मदतीने UPI खातं सक्रिय करता येणार आहे. अशा प्रकारचं फीचर जारी करणारे PhonePe पहिले UPI अॅप असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.

यूजर PhonePe अॅप ऑनबोर्डिंग प्रोसेसमध्ये आधार कार्डचा पर्याय निवडू शकणार आहेत. यासाठी यूजरला आधार कार्डचे शेवटचे 6 अंक टाकावे लागतील. या सुविधेमुळे आता युजर्स डेबिट कार्डच्या डिटेल्सशिवाय हे पेमेंट अॅप वापरू शकणार आहेत.

Online payment

Online payment

हेही वाचा: Digital Payment: फोन हरवला तर PhonePe, GPay आणि Paytm कसं ब्लॉक करणार?

कंपनीच्या या नव्या फीटरमुळे UPI ऑनबोर्डिंग प्रक्रिया अधिक सुलभ होईल, असे PhonePe पेमेंटचे प्रमुख दीप अग्रवाल यांनी म्हटले आहे. डेबिट कार्ड डिटेल्सशिवाय युपीआय खातं सुरू करणारे पहिले फिनटेक प्लॅटफॉर्म बनले आहे.

आधार वापरून नवीन ऑनबोर्डिंग प्रक्रिया UPI इकोसिस्टमच्या वाढीस मदत करेल. यामुळे नवीन ग्राहकांना डिजिटल पेमेंट अॅपवर येण्यासही मदत होईल असे अग्रवाल म्हणाले. NPCI सोबत चर्चा करून UPI ​​ला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याची कंपनीची इच्छा असल्याचेही अग्रवाल यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा: डिजिटल पेमेंट करताना भीती वाटते? ऑनलाइन फसवणूक टाळण्यासाठी या टिप्स फॉलो करा

अशी आहे रजिस्ट्रेशन प्रोसेस

पूर्वी UPI पेमेंट नोंदणी प्रक्रियेसाठी डेबिट कार्ड असणे आवश्यक होते. त्यामुळे ज्यांच्याकडे डेबिट कार्ड नव्हते त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. मात्र, कंपनीच्या नव्या सुविधेमुळे आता ही प्रक्रिया आधार-आधारित करण्यात आली आहे.

यूजर आता PhonePe वर नोंदणी करताना आधार कार्डचा पर्याय निवडू शकणार आहेत. यासाठी आधारचे शेवटचे 6 अंक आवश्यक असतील. हे सहा नंबर टाकल्यानंतर यूजरला रजिस्टर मोबाइल क्रमांकावर UIDAI कडून OTP मिळेल. तसेच बँकेकडूनही OTP मिळेल. या दोन्हींची पडताळणी पूर्ण झाल्यानंतर यूजर पेमेंट अॅप वापरू शकणार आहेत.