डिजिटल पेमेंट करताना भीती वाटते? ऑनलाइन फसवणूक टाळण्यासाठी या टिप्स फॉलो करा|Follow tips to avoid online fraud | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Online Payment

डिजिटल पेमेंट करताना भीती वाटते? ऑनलाइन फसवणूक टाळण्यासाठी या टिप्स फॉलो करा

डिजिटलायझेशनमुळे जग जवळ आलंय. ऑनलाइन पेमेंटमुळे लोकांना एका क्लिकवर व्यवहार करणे सोपे झाले आहे मात्र कधी कधी एका चुकीच्या क्लिकमुळे तुम्हाला अनेक आर्थिक अडचणींचासुध्दा सामना करावा लागू शकतो. तुम्ही डिजिटल व्यवहार नियमित करत असाल तर आर्थिक फसवणुकीपासून सावध राहा. यासाठी तुम्ही सुरक्षितता जपली पाहिजे.

तंत्रज्ञानात बरीच प्रगती झाली आहे मात्र फसवणूक करणारे तंत्रज्ञानातील या प्रगतीचा चुकीचा वापर करु शकतात. ऑनलाइन पेमेंटपासून सुरक्षित राहण्यासाठी या सात महत्त्वाच्या टिप्स फॉलो करा (check some important ways to safeguard yourself from online payments)

हेही वाचा: गुगलला आता आपण सर्च रिजल्टवरुन वैयक्तिक माहिती काढून टाकण्यास सांगू शकतो

1. फक्त स्मार्ट अधिकृत अॅप्स वापरा

मोबाईल ॲप्समुळे अनेक सेवा सुसह्य होतात.फायनान्शिअल ॲप असो किंवा गेम्स ॲप, तुमच्या मोबाइल फोनवरॲप्लिकेशन्स इन्स्टॉल करण्यापुर्वी योग्य पडताळणी करा. केवळ Google Play Store, Apple App Store किंवा Windows App Store सारख्या प्ले स्टोअर्सवरून कोणतेही अॅप्स डाउनलोड करा.

2. फक्त सुरक्षित आणि अधिकृत वेबसाइटचा वापर करा

वेबसाइट खरी आहे की खोटी याची खात्री असल्याशिवाय तुम्ही ऑनलाइन पेमेंट करणे टाळावे. फक्त त्या वेबसाइट्स ज्यात URL मध्ये "www" आणि डोमेन नावाच्या आधी "https://" असेल, अशा वेबसाइटचा वापर करा.

हेही वाचा: फक्त 2599 रुपयांत खरेदी करा स्मार्टफोन, जिंका खास ऑफर्स!


3. सुरक्षित इंटरनेट कनेक्शन वापरा

सार्वजानिक कनेक्शन (Wi-Fi) वापरण्यावरुन तुम्हाला अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. कारण हा फसवणूक करणाऱ्यांसाठी महत्त्वाचा मार्ग आहे. जर तुम्ही ऑनलाइन पेमेंट करणार असाल, तर त्यासाठी सुरक्षित खाजगी इंटरनेट कनेक्शन वापरा


4. कार्ड वापरताना सावध रहा

नेहमी डोळ्यांसमोर कार्ड पेमेंट करा आणि कार्ड रीडिंग POS मशीन योग्य आहे की नाही ते तपासा. स्किमर्सद्वारे कार्ड क्लोन केल्याच्या अनेक बाबी समोर आल्या आहेत. ऑनलाइन पेमेंट करताना कार्ड तुमच्या नजरेसमोर असले पाहिजे. तुमचे कार्ड हरवल्यास, ताबडतोब बँकेला कळवणे आणि ते ब्लॉक करणे, गरजेचे आहे.

हेही वाचा: तंत्रज्ञान क्षेत्रातील सर्वात मोठे व्यवहार; कोणत्या कंपनीची कितीला विक्री ?

5. कंप्यूटर आणि मोबाईलची सुरक्षितता अपग्रेड करा

ऑनलाइन फसवणूक टाळण्यासाठी तुमचा कंप्यूटर आणि मोबाइल फोनची सिक्युरीटी सॉफ्टवेअर, वेब ब्राउझर आणि ऑपरेटिंग सिस्टम अपडेट ठेवा. तुमचा पासवर्ड नेहमी विशेष कॅकेक्टर, अक्षरे, संख्या आणि अप्पर आणि लोअर केससह ठेवा. सोबतच पासवर्ड नियमितपणे बदलण्याचे सवय लावा.

6. अनोळखी कॉल आणि मॅसेजला प्रतिसाद देऊ नका

आपल्या सर्वांना फसवे कॉल, ईमेल आणि मॅसेज येत असतात. जे आपली वैयक्तिक माहिती उघड करण्याकरीता फसवण्याचा प्रयत्न करतात. फसवणूक करणारे कॉलर एखाद्या बँक किंवा वित्तीय संस्थेचे कर्मचारी म्हणून आपली ओळख सांगू शकतात आणि मोफत कॅशबॅक, लॉटरी इत्यादींचा हवाला देऊन ते तुमचे आर्थिक माहिती विचारू शकतात. एकदा त्यांना तुमची बँक माहिती मिळाल्यावर ते तुमच्या नकळत तुमच्या बँक खात्यातून पैसे चोरू शकतात

हेही वाचा: Solar Eclipse 2022: वर्षाचं पहिलं सूर्यग्रहण आज दिसणार

७. तुमची वैयक्तिक माहिती शेअर करणे टाळा

तुमची वैयक्तिक आणि बँक-संबंधित माहिती ऑफलाइन किंवा ऑनलाइन कधीही शेअर करू नका. वित्तसंस्थेतील अधिकाऱ्याच्या वेशात सायबर स्कॅमरसुद्धी असू शकतो.त्यामुळए बँकेची माहिती विचारणाऱ्या व्यक्तीची ओळख नेहमी पडताळून पाहा आणि तुमची वैयक्तिक माहिती सोशल नेटवर्किंग साइटवर कधीही शेअर करू नका.

Web Title: Check Some Important Ways To Safeguard Yourself From Online Payments

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top