Digital Skills : डिजिटल सर्वसमावेशक तंत्रज्ञान

अपंग व्यक्तींना लागू केलेले सर्वसमावेशक तंत्रज्ञान पूर्वी ‘विशेष गरजा संगणन
Digital
Digital sakal

डिजिटल सर्वसमावेशक तंत्रज्ञान (डिजिटल इनक्लुझिव्ह टेक्नॉलॉजी) ही सर्व व्यक्ती आणि समुदायांना माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञानामध्ये प्रवेश आणि वापर करण्यासाठीची सुविधा व खात्री देऊन आवश्यक असलेल्या क्रियाकल्पांची प्रक्रिया उपलब्ध करून देते. ही सामाजिक-तांत्रिक प्रक्रिया असून व्यक्ती, समुदाय, असुरक्षित गटांना संगणक-इंटरनेट तंत्रज्ञान वापरण्यासाठीची डिजिटल कौशल्ये विकसित करण्यासाठी उपयुक्त आहे.

अपंग व्यक्तींना लागू केलेले सर्वसमावेशक तंत्रज्ञान पूर्वी ‘विशेष गरजा संगणन’, त्यानंतर ‘अनुकूल तंत्रज्ञान’ आणि अलीकडे ‘सहायक तंत्रज्ञान’ म्हणून संबोधले जात आहे. सामान्यतः संगणकाशी संबंधित सुलभतेच्या संदर्भात, समावेशाशी संबंधित विविध संज्ञा आहेत त्यात एकात्मिक शिक्षण, विशेष शिक्षण आणि सामाजिक मुख्य प्रवाह हे घटकही समाविष्ट आहेत.

सर्व पार्श्वभूमी आणि क्षमतांच्या लोकांना समजणारी आणि सक्षम करणारी उत्पादने तयार करण्यासाठी डिजिटल इनक्लुझिव्ह डिझाईन हे क्षेत्र कार्यरत आहे. प्रवेशयोग्यता, वय, आर्थिक परिस्थिती, भौगोलिक स्थान, भाषा, वंश आणि बरेच काही गोष्टींचा यामध्ये समावेश होतो आहे.

उच्च डिजिटल इनक्लुझिव्ह तंत्रज्ञानामध्ये व्हॉइस सिंथेसायझर, ब्रेल रीडर किंवा व्हॉइस सक्रिय केलेले अद्ययावत संगणक आदी प्रमुख घटकांचा समावेश व त्या आधारित प्रक्रिया उपलब्ध आहेत. सहाय्यक तंत्रज्ञान ही सामान्य संज्ञा आहे. ती अपंग लोक वापरत असलेल्या साधनांचे विकसन करते. लोकांना वेबवर प्रवेश करण्यासाठी संगणक वापरण्यास स्क्रीन वाचक हे संगणक स्क्रीनवरील सामग्री वाचण्यासाठी अंध किंवा दृष्टिहीन लोकांसाठी वापरलेले सॉफ्टवेअर मदत करते.

सहाय्यक तंत्रज्ञानाचे प्रकारांमध्ये वेफाइंडिंगमध्ये मदत करण्यासाठी पेंट वापरणे, लिफ्टवर जाण्यासाठी मजल्यावरील निळ्या रेषेचे अनुसरण करणे, होममेड ग्रिप्स जसे पेन्सिलभोवती डक्ट टेप गुंडाळणे किंवा चमच्याच्या हँडलभोवती पाइप इन्शुलेशन, आदींसाठी चे डिजिटल सेन्सिंग पर्यायही आता उपलब्ध आहेत. स्पीच जनरेटिंग डिव्हाईस जे डोळा टक लावून सक्रिय केले जाऊ शकतात.

आरोग्यसेवेतील सहाय्यक तंत्रज्ञानामध्ये लिफ्ट, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग साधने, आभासी कार्यालयीन तास, हालचाल आणि संवेदी कमजोरी संगणक सॉफ्टवेअर्स, उपचारात्मक हस्तक्षेप, स्वयंचलित पृष्ठ टर्नर, स्मार्ट श्रवणयंत्र आदींसाठीची कौशल्ये ही या क्षेत्रात महत्त्वाची ठरत आहेत.

स्पीच आणि ऑगमेंटेटिव्ह कम्युनिकेशन, पर्यायी इनपुट उपकरणे, कपडे आणि ड्रेसिंग संज्ञानात्मक मदत, पर्यावरणीय नियंत्रणे आणि स्विचेस, क्रीडासंबंधी मदत अशी अनेक उपक्षेत्रे यामध्ये कौशल्य विकासासाठी निगडित झाली आहेत.

पॉवर व्हीलचेअर आणि स्कूटर, डिजिटल श्रवणयंत्र, व्हॉइस रेकग्निशन किंवा मॅग्निफिकेशन सॉफ्टवेअर सारख्या विशिष्ट सॉफ्टवेअरसह संगणक, दैनंदिन जीवनासाठी इलेक्ट्रॉनिक साहाय्य, डिजिटल हँड्स-फ्री हेडसेट, आवाज सक्रिय टेलिफोन, आवाजांसह संप्रेषण साधने, आणि ब्लूटूथ एकत्रीकरण अशी अनेक उपकरणे व सजगपणे वापराची प्रशिक्षण कौशल्ये असणाऱ्या व्यक्तींची या क्षेत्रात मोठी आवश्यकता आहे.

घोटीट, इंटेल रिडर, कुर्झवेईल ३०००, जिंगर, जोउस३, ड्राफ्ट बिल्डर आदी अनेक प्रकारची सॉफ्टवेअर्स ही सहाय्यभूत तंत्रज्ञान म्हणून वापरली जातात या सॉफ्टवेअरच्या वापरांची कौशल्ये त्या त्या व्यक्तींच्या अंगी विकसित करणाऱ्या प्रशिक्षकांनाही विशेष संधी उपलब्ध आहेत. सहाय्यक तंत्रज्ञानामध्ये व्हीलचेअर, कृत्रिम अंग आणि छडीपासून ते स्क्रीन रीडर, अॅप्स, अडॅप्टिव्ह कंट्रोलर आणि बरेच काही असून अपंग लोकांची कार्यक्षम क्षमता कायम ठेवणे किंवा सुधारू शकणारी कोणतीही गोष्ट डिजिटल सहाय्यक तंत्रज्ञानामध्ये येत असल्याने या क्षेत्रात अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com