दिवाळीत मित्र-मैत्रिणींना गिफ्ट देण्यासाठी पाच बेस्ट गॅजेट्स

diwali 2021
diwali 2021sakal media

दिवाळीचा सण अगदी उद्यावर येऊन ठेपला आहे, धनत्रयोदशी म्हणजे उद्या या प्रकाशउत्सवाची सुरुवात होईल आणि या दिवशी बरेच जण हे सहसा सोने किंवा चांदीच्या वस्तू किंवा इतर ग्रहउपयोगी वस्तू खरेदी करून हा दिवस साजरा करतात. मात्र आधुनिक काळात, लोक या दिवसाच्या निमित्ताने भेटवस्तू म्हणून इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करू लागले आहेत. जर तुम्ही परंपरा सोडून धनत्रयोदशीच्या दिवशी घरासाठी एखादी इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर या सणाच्या काळात तुमच्यासाठी काही गॅझेट्स घेऊन आलो आहोत, जे तुम्ही तुमच्या कुटुंबीयांमना भेट म्हणून देऊ शकता.

Apple AirTag

Apple AirTag तुमच्या घरातील एखाद्या व्यक्तीसाठी बेस्ट गिफ्ट आहे ज्यांच्याकडून अनेकदा चाव्या आणि वॉलेट सारख्या गोष्टी हरवतात. या एका एअरटॅगची किंमत 3,190 रुपये आहे आहे तर चार पॅकची किंमत 10,900 रुपयांपर्यंत जाते.

Amazon Echo Dot 4th gen

स्मार्ट स्पीकर हा देखील दिवाळीत गिफ्ट देण्यासाठी बेस्ट पर्याय ठरु शकतो, कारण सर्व स्मार्ट होम उपकरणे कंट्रोल करण्यासाठी तो एक नोडल पॉइंट आहे. Amazon Echo Dot 4th gen या अलेक्सा द्वारे सपोर्ट देण्यात आला आहे आणि ते 1.6-इंच फ्रंट फायरिंग स्पीकरसह येते आणि तुमचे स्मार्ट होम हब म्हणून काम करते. या डिव्हाईसची किंमत 3,649 रुपये इतकी आहे.

diwali 2021
या महिन्यात लॉंच होतायत 'हे' दमदार फोन, पाहा यादी

Mi Robot Vacuum Mop P

रोबोटिक व्हॅक्यूम क्लिनर ही त्यांच्यासाठी एक बेस्ट गिफ्ट आहे ज्यांना घरातील सर्व कामे स्वतः करावे लागतात. हे Xiaomi चे रोबोटिक व्हॅक्यूम क्लिनर Amazon Alexa आणि Google Assistant सोबत काम करते. हे टू-इन-वन स्वीपिंग आणि मोपिंग फंक्शनसह येते. यामध्ये तुम्हाला अँटी-फॉल आणि अँटी-कॉलाईड सेन्सर्स, लेझर नेव्हिगेशन आणि मल्टी-मॅप सपोर्ट यांसारखी फीचर्स देखील देण्यात आली आहेत. याची किंमत 20 हजार रुपये इतकी आहे.

Amazon Fire TV Stick 4K

तुमच्या एखाद्या मित्राला टिव्ही पाहणे आवडत असेल तर तुम्ही त्याची टिव्ही अपग्रेड करु शकता. त्यासाठी तुम्ही त्याला स्ट्रीमिंग डिव्हाइस भेट द्या. सध्या बाजारात अनेक स्ट्रीमिंग डिव्हाईस उपलब्ध आहेत ज्यापैकी तुम्ही खरेदी करू शकता त्यामध्ये Amazon Fire TV Stick 4K हा ऑप्शन बेस्ट आहे. अलेक्सा व्हॉईस रिमोट अॅक्सेससह वापरकर्त्यांना 4K अल्ट्रा एचडी व्हिडिओ क्वालिटी, डॉल्बी व्हिजन, डॉल्बी अॅटमॉस, एचडीआर, एचडीआर-10 ऑडिओ-व्हिडिओ टेक्नोलॉजी आणि Prime Video, Hotstar, Netflix, Zee5, Sony LIV, Apple TV आणि इतर ओटीटी अॅप्सचा यामध्ये अॅक्सेस मिळेल. या गॅझेटची किंमत 5,999 रुपये आहे.

diwali 2021
या आहेत हायटेक फीचर्स असलेल्या देशातील सर्वात स्वस्त SUV कार

Dyson Pure Cool air purifier

एअर प्युरिफायर ही देशातील बऱ्याच शहरांमध्ये काळाची गरज झाली आहे. ज्यांच्या घरात मुले आणि वृद्ध लोक आहेत त्यांच्यासाठी ते विशेषतः उपयुक्त आहेत. त्यामुळे या दिवाळीत तुम्ही तुमच्या जवळच्या नातेवाईकांना बेस्ट एअर प्युरिफायरपैकी एक म्हणजे डायसन प्युअर कूल एअर प्युरिफायर गिफ्ट देऊ सकता. हे HEPA HP 13 आणि कार्बन नॅनो फिल्टरसह येते आणि ते Dyson Link अॅप किंवा सोबतच्या रिमोट कंट्रोलचा वापर करून कंट्रोल केले जाऊ शकते. या प्युरिफायरची किंमत 39,015 रुपये इतकी आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com