Diwali Sale 2022 : Flipkart वर पुन्हा सुरू होतोय दिवाळी सेल, जाणून घ्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Diwali Sale 2022

Diwali Sale 2022 : Flipkart वर पुन्हा सुरू होतोय दिवाळी सेल, जाणून घ्या खासियत

Flipkart Big Diwali Sale 2022 : ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म Flipkart वर Big Diwali Sale पुन्हा सुरू होत आहे. मागचा सेल १६ ऑक्टोबरला संपला. या काळात जर तुम्ही इथल्या बेस्ट डील्स आणि ऑफर्सचा फायदा घेऊ सकला नसाल तर निराश होण्याचं कारण नाही. करण Flipkart Big Diwali Sale पुन्हा सुरू होत असून यात भरपूर वस्तू कमी किमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.

हेही वाचा: Diwali Shopping: कुठे मिळेल सर्वात स्वस्त 65 इंच स्मार्ट टीव्ही? पाहा Flipkart-Amazon वरील ५ ऑफर

हा सेल १९ ऑक्टोबरपासून सुरू होत असून २३ ऑक्टोबरपर्यंत असणार आहे. याचे सर्व डिटेल्स अजून मिळाले नसले तरी मागच्या सेल सारखे ऑफर्स मिळण्याची शक्याता आहे.

हेही वाचा: Flipkart सुरू होतोय दिवाळी सेल, iPhone 13 सह 'या' फोन्सवर मिळेल बंपर सूट

बँक कार्ड्सवर मिळणार १० टक्के इंस्टंट डिस्काउंट

या सेलमध्ये खरेदी करणाऱ्यांना स्टेट बँक ऑफ इंडिया(SBI)च्या बँक कार्डने पैसे भरल्यास किंवा EMI वर खरेदी केल्यास १० टक्के इंस्टट डिस्काउंट मिळणार, असं शॉपिंग वेबसाइटवर शेअर झालेल्या टीजरवरून समजलं आहे. तर फ्लिपकार्ट ॲक्सिस बँक क्रेडिट कार्डवरून खरेदी केल्यावर ५ टक्के कॅशबॅक मिळणार आहे. पेटिएम वॉलेट आणि UPI पेमेंट केल्यावर १० टक्के कॅशबॅक मिळेल.