Diwali: दिवाळीला बाइक खरेदी करताय, सोबत या Accessories घ्या, चोरी अन् सेफ्टीची चिंता होईल दूर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bike Accessories

Diwali: दिवाळीला बाइक खरेदी करताय, सोबत या Accessories घ्या, चोरी अन् सेफ्टीची चिंता होईल दूर

Bike News: दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर अनेकजण घरात नव्या गोष्टी विकत घेतात. तुम्ही जर बाइक विकत घेत असाल किंवा घेतली असेल तर बाइकच्या या पाच Accessories तुम्ही आवर्जून घ्यायला हव्यात. त्यानंतर तुम्हाला गाडीच्या चोरीची किंवा सेफ्टीची अजिबात चिंता राहाणार नाही. तसेच यासोबतत राइडिंगदरम्यान तुम्ही सुरक्षितही राहाल.

हेलमेट

बाइक चालवताना सगळ्यात महत्वाचं असतं ते हेलमेट. त्यामुळे सुरक्षतेबाबत स्वस्त अन् हलके हेलमेट घेऊन तुम्ही जिवाशी खेळू नका. हेलमेट विकत घेताना ते चांगल्या क्वॉलीटीचं असावं आणि त्यावर आएसआयचा मार्क असावा. (helmet)

टॉप बॉक्स

स्कूटरसारखी बाइकमध्ये सामान ठेवण्यासाठी जागा नसते. अशा वेळी जर तुम्हाला सामान ठेवायचं असेल तर टॉप बॉक्स लावावा लागेल. यात बाइकचं हेलमेट ठेवण्याव्यतिरिक्त तुम्ही इतर महत्वाच्या गोष्टीही ठेवू शकता. बाजारात टॉप बॉक्स तुम्हाला सहज मिळेल.

सेफ्टी ग्लव्ज

बाइक चालवताना हेलमेट व्यतिरिक्त ग्लव्जसुद्धा महत्वाचे असतात. ग्लव्ज घातल्याने बाइक चालवताना हँडलवर चांगली ग्रीप असते. तर दुसरीकडे तुमचे हातही खराब होण्यापासून वाचतात. बाजारात तुम्हाला विविध प्रकारचे हँड ग्लव्ज मिळतील.

बाइक लॉक

बाइक लॉक कुठल्याही बाइकची चोरी होण्यापासून बचाव करते. बाजारात तुम्हाला अनेक प्रकारचे लॉक मिळतील. साम्यानत: लॉक बाइकच्या पुढल्या चाकाला लावलं जातं. ज्यामुळे बाइकचा चाक जाम होतो. त्यामुळे एखाद्याने तुमची बाइक चोरी करण्याचा प्रयत्न केला तरी ते शक्य होणार नाही. तसेच लॉकसह तुम्हाला युनिक चावी मिळते. ज्याच्या मदतीने तुम्ही लॉक सहज उघडू शकता.

टूल आणि पंचर किट

नव्या बाइकसह कंपनी बेसिक टूल देतेच. पण बाइकची बेसिक किट अनेकदा पुरेशी नसते. सुरक्षेच्या दृष्टीने तुमच्या बाइकमध्ये कायम एक चांगली टूल किट असायला हवी. बाइकमध्ये दोन टायर असतात. त्यातील एक जरी पंचर झाला तरी तुम्ही अडचणीत येता. अशा वेळी तुमच्याजवळ पंचर किट असल्यास तुम्ही बिनधास्त राहाता.

या दिवाळीला अशा प्रकारे तुमची बाइक घेण्याबरोबरच तुम्ही कायमचे सेफ देखील राहाल.

टॅग्स :Diwali FestivalBikeDiwali