
जीएसटी सुधारणांमुळे दिवाळीत टीव्ही, एसीसारख्या वस्तू स्वस्त होण्याची शक्यता आहे.
बाजारपेठेत उत्साह वाढला असून विक्रमी विक्रीची अपेक्षा आहे.
टियर-2, टियर-3 शहरांना परवडणाऱ्या किमतीत प्रीमियम उत्पादने मिळतील.
GST reform 2025 : यंदाच्या दिवाळीत ग्राहकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी जीएसटी सुधारणांची घोषणा केल्यानंतर बाजारपेठ उत्साहाने भरली आहे. या सुधारणांमुळे टीव्ही, फ्रिज आणि एअर कंडिशनरसारख्या ग्राहकोपयोगी वस्तू स्वस्त होऊ शकतात. सध्या जीएसटीचे चार स्लॅब (५%, १२%, १८%, २८%) असून येत्या दिवाळीपासून हे फक्त ५% आणि १८% असे दोन स्लॅब होण्याची शक्यता आहे. याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नसली तरी उद्योग क्षेत्रात उत्साह आहे.