
google gemini
दिवाळीत छान तयारी करून सोशल मिडियावर पोस्ट करण्याची लगबग सर्वांचीच असते. पण यंदा एक ट्विस्ट आहे! फोटोग्राफर्स बुक करणे किंवा तासनतास एडिटिंग करणे आता विसरून जा - लोक आता गुगल जेमिनी, एक एआय इमेज जनरेटर वापरत आहेत, ज्यामुळे बॉलीवूड चित्रपटासारखे दिसणारे चमकदार, पोर्ट्रेट तयार केले जातात. फेरी लाइट बॅकड्रॉपासून ते सिनेमॅटिक ग्लो-अपपर्यंत, हे व्हायरल प्रॉम्प्ट प्रत्येकाला एक डिजिटल मेकओव्हर देत आहेत जे इंस्टावर पोस्ट करण्यासाठी योग्य आहे.
सोशल मीडियावर यूजर्स त्यांच्या दिवाळी पोर्ट्रेटच्या एआय-जनरेटेड व्हर्जन शेअर करत आहेत जे सणासाठी चमक आणि पारंपारिक आकर्षण कॅप्चर करतात, हे सर्व जेमिनीमध्ये टाइप केलेल्या काही क्रिएटिव्ह शब्दांद्वारे तयार केले जातात. जर तुम्हालाही हा ट्रेंड फॉलो करायचा असेल तर पुढील गोष्टी लक्षात ठेऊ शकता.