
Mosquito Killer : स्मार्टफोनमधले अॅप्स डासांना पळवतात ? वापरकर्ते म्हणतात...
मुंबई : पावसाळ्यात डासांची संख्या झपाट्याने वाढू लागते आणि अशा परिस्थितीत हे डास घरात घुसून त्रास देऊ लागतात. हेच डास नंतर डेंग्यू आणि मलेरियासारखे प्राणघातक आजार पसरवतात. आजकाल प्ले स्टोअरवर काही अॅप उपलब्ध आहेत, ज्याचा वापर करून तुम्ही सहजपणे डासांना दूर करू शकता.
हेही वाचा: Save Electricity : या ३ उपकरणांचा वापर थांबवा; वीजेचे बिल होईल अर्ध्याहून कमी
हे सर्व असे अॅप्स आहेत जे वारंवार आवाज निर्माण करतात आणि त्यांच्या आवाजाने डास दूर जातात. या अल्ट्रासोनिक फ्रिक्वेन्सी ध्वनीचा आवाज इतका कमी आहे की तो कोणत्याही व्यक्तीला ऐकू येत नाही, परंतु विकासकांचा दावा आहे की ते डासांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि त्यांना दूर घालवण्यासाठी खूप उपयुक्त आहे.
आता हे खरे आहे का, असा प्रश्न पडतो, तर त्याचे स्पष्ट उत्तर ‘नाही’ असेच आहे असे सांगतो. हे अॅप वापरून डास पळून जात नाहीत. बर्याच लोकांनी याचा वापर केला आहे आणि बहुतेक लोकांनी या अॅप्स आणि त्यावरील आवाजांना खूप नकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत. या अॅप्सवरील जाहिरातींची संख्याही खूप जास्त आहे. जेव्हा तुम्ही त्याचा वापर कराल, तेव्हा तुम्हाला प्रत्येक वेळी जाहिरातींचा त्रास होत राहील.
Web Title: Do Smartphone Apps Repel Mosquitoes Users Say
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..